सोन्यासाठी चोरट्यांचा नवा गोरखधंदा, स्मशानात महिलेच्या अस्थींवर चोरट्यांचा डल्ला

Thieves new venture for gold: पाटील कुटुंबानं या सगळ्या घटनेला जळगाव महापालिकेला जबाबदार धरलंय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 8, 2025, 10:07 PM IST
सोन्यासाठी चोरट्यांचा नवा गोरखधंदा, स्मशानात महिलेच्या अस्थींवर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांचा नवा गोरखधंदा

Thieves new venture for gold: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल.या गोष्टीतली भीमा नावाची व्यक्ती पोटाची खळगी भरण्यासाठी स्मशानात पुरलेल्या मृतदेहाच्या तोंडातलं सोनं चोरु लागते. झटपट पैसै मिळवण्याच्या हव्यासापोटी भीमा ही चोरी करत असतो. जळगावातही असाच काहीसा प्रकार घडलाय.. त्यामुळे जळगाव नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Add Zee News as a Preferred Source

जळगावच्या मेहरूण येथील स्मशानभूमीत पाटील कुटुंब बसलेलं होतं. या कुटुंबावर मोठा विचित्र प्रसंग ओढावलाय.कारण मृत आईच्या अस्थिंसाठी हे कुटुंब ताटकळत बसलंय.. गायत्री नगर इथं राहणा-या आर. के. पाटील यांच्या आई छबाबाई यांचं वृद्धपकाळानं निधन झालं.. आईच्या इच्छेनुसार अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह त्यांच्या पार्थिला अग्नि देण्यात आला. अस्थी विसर्जनासाठी जेव्हा हे कुटुंब स्मशानभूमित दाखल झालं तेव्हा डोकं, पाय आणि हाताच्या अस्थी गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. अंगावरील सोन्यासाठी अज्ञात चोरट्यांनी छबाबाईंच्या अस्थी चोरुन नेल्या. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडालीये.आम्हाला सोनं नको पण मृत आईच्या अस्थि परत करा अशी मागणी पाटील कुटुंबानं केलीय.

पाटील कुटुंबानं या सगळ्या घटनेला जळगाव महापालिकेला जबाबदार धरलंय. स्मशानभूमी भोवती कुंपण, सीसीटीव्ही असतं तर अशी घटना घडल्या नसती असा दावा पाटील कुटुंबियांनी केलाय.. तर या घटनेवरून आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर ताशेरे ओढले असून, मेलेल्या नागरिकांचीही अस्थी सुरक्षित नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सोन्याचा दर आता सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर आलाय.. त्यामुळे झटपट पैसा मिळवण्यासाठी सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यात.. त्यातच आता चोरट्यांनी चक्क स्मशानातील अस्थींवरही डल्ला मारल्यामुळे संतापाची लाट उसळलीये.

FAQ

प्रश्न: जळगाव स्मशानभूमीतील अस्थी चोरी प्रकरण काय आहे आणि कोणावर घडले?

उत्तर: जळगाव जिल्ह्यातील मेहरूण येथील स्मशानभूमीत गायत्री नगरातील आर. के. पाटील यांच्या आई छबाबाई पाटील (वृद्धपकाळाने निधन) यांच्या अस्थी चोरीला गेल्या आहेत. छबाबाई यांच्या पार्थिवाला अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अग्नी देण्यात आला होता. अस्थी विसर्जनासाठी कुटुंब स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा डोके, हात आणि पायांच्या अस्थी गायब असल्याचे निदर्शनास आले. संशय आहे की सोन्याच्या दागिन्यांसाठी अज्ञात चोरट्यांनी अस्थी चोरून नेल्या. कुटुंबाने सोन्यापेक्षा मृत आईच्या अस्थी परत करण्याची मागणी केली आहे.

प्रश्न: या घटनेसाठी कोण जिम्मेदार असल्याचा आरोप आहे आणि काय कारवाई अपेक्षित आहे?

उत्तर: पाटील कुटुंबाने जळगाव महानगरपालिकेला जबाबदार धरले असून, स्मशानभूमीभोवती कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. आमदार सुरेश भोळे यांनीही महापालिकेवर टीका केली असून, "मरणानंतरही अस्थी सुरक्षित नसणे ही लाजिरवाणी बाब" असे म्हटले आहे. या प्रकरणाची तक्रार नोंदवली जाईल आणि महापालिकेला सुरक्षिततेच्या दृष्टीने सुधारणा करण्यास सांगितले जाईल.

प्रश्न: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अशा घटना का वाढत आहेत आणि काय धडा घ्यावा?

उत्तर: सोन्याचा दर सध्या सव्वा लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने झटपट पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता चोरट्यांनी स्मशानभूमीतील अस्थींवरही हात टाकल्याने संतापाची लाट उसळली आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या "स्मशानातील सोनं" कथेप्रमाणे ही घटना वास्तविक झाली आहे. शेतकरी, कुटुंबीयांनी पार्थिवाच्या अग्निदाहानंतर अस्थी विसर्जनापर्यंत सतर्क राहावे आणि स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षिततेची मागणी करावी.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More