जळगांव : भुसावळ येथे मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर मावसा आणि मामाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातून भुसावळ येथे मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर मावसा आणि मामाने अत्याचार केल्याप्रकरणी गुरुवारी पीडित मुलीची मावशी, मावसा व मामा विरूद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा गुन्हा दाखल झाला. २१ जून २०२१ च्या सात महिन्यांपूर्वी हे अत्याचार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


याबाबत फिर्यादीत नमूद केल्यानुसार मध्यप्रदेशातल्या बर्‍हाणपूर येथून १७ वर्षीय मुलगी सात महिन्यांपूर्वी भुसावळ शहरातील नेमाडे कॉलनीतील रहिवासी तिची मावशी प्रमिला संतोष गिरी हिच्याकडे शिक्षणासाठी आली होती. या दरम्यान तिचा मावसा संतोष लागीर गिरी याने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मुलीने तिच्या मावशीला सांगितले असतांना तिने याकडे दुर्लक्ष केले. यानंतर संबंधीत मुलगी ही तिचा मामा संतोष वामनराव भारतीकडे राहण्यासाठी गेली. मात्र, तेथेही मामाने सलग सात महिने अत्याचार केले. 


या सर्व प्रकारानंतर धाडस करून पीडित मुलीने गुरुवारी बाजारपेठ पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार मावसा संतोष लागीर गिरी (वय ५३ रा.खडका रोड, नेमाडे कॉलनी, भुसावळ), मामा संतोष भारती (वय ३८, रा.खडका रोड, पाटील मळा, भुसावळ) आणि मावशी प्रमिला संतोष गिरी (वय ४८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यापैकी संतोष गिरी व संतोष भारती यांना अटक करण्यात आली असून संतोष गिरीचा शोध सुरू आहे.


पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पीडित बालिकेला जळगाव येथे रवाना केले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत आणि त्यांचे सहकारी करत आहेत.