2 अभिनेते व दिग्दर्शकाचा मृत्यू, सिनेमा बनवण्यासाठी लागली 23 वर्षे; बॉलिवूडमधील सगळ्यात शापित चित्रपट

बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत अनेकांना उत्सुकता असते. आज आम्ही अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याला शापित म्हणून संबोधले गेले. 

Mansi kshirsagar | Nov 04, 2025, 10:31 PM IST
twitter
1/8

2 अभिनेते व दिग्दर्शकाचा मृत्यू, सिनेमा बनवण्यासाठी लागली 23 वर्षे; बॉलिवूडमधील सगळ्यात शापित चित्रपट

1986 Most Unlucky Film Love And God Took 23 Years To Be Release 2 Actor Director Died During Shoot

 ज्या बॉलिवूड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत त्या चित्रपटाला फिल्म इंडस्ट्रीत शापित म्हणून ओळखले गेले. 

twitter
2/8

 चित्रपट बनवण्यासाठी 23 वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र या दरम्यान चित्रपटातील अभिनेते व दिग्दर्शकाचाही मृत्यू झाला

twitter
3/8

आपल्या देशात अनेक भाषांमध्ये चित्रपट बनवले जातात. काही चित्रपट बनवण्यासाठी फक्त 3 ते 4 महिने लागतात, तर काही पूर्ण होण्यासाठी वर्षे लागू शकतात. मात्र "लव्ह अँड गॉड" नावाचा हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त 4 किंवा 5 वर्षे नाही तर २३ वर्षे लागली.

twitter
4/8

मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला तितकाच प्रतिसाद दिला. 23 वर्ष या सिनेमासाठी लागल्यामुळं त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. या चित्रपटात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री होते जे आता हयात नाहीत. 

twitter
5/8

हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचे निर्मिते आणि दिग्दर्शन के. आसिफ  होते. प्रसिद्ध दिग्दर्शक के. आसिफ यांनी बनवलेला हा पहिला रंगीत चित्रपट होता आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपटही ठरला. हा चित्रपट लैला आणि मजनूच्या प्रेमकथेवर आधारित होता. या चित्रपटात संजीव कुमार आणि निम्मी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अभिनेत्री निम्मीने लैलाची भूमिका केली होती तर संजीव कुमार यांनी मजनूची भूमिका साकारली होती.

twitter
6/8

या चित्रपटाचे चित्रीकरण 1963 मध्ये सुरू झाले. सुरुवातीला अभिनेता गुरु दत्त यांची मुख्य भूमिका करण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र पुढच्या वर्षी, 1964 मध्ये त्यांचे निधन झाले, ज्यामुळे चित्रपट थांबविण्यात आला.

twitter
7/8

चार वर्षांनंतर, 1970 मध्ये, संजीव कुमार यांना मुख्य भूमिकेत घेण्यात आले आणि चित्रीकरण सुरू झाले. पण चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही काळातच, दिग्दर्शक के. आसिफ यांची प्रकृती बिघडली आणि ते बराच काळ आजारी राहिले आणि अखेर 1971 मध्ये त्यांचे निधन झाले.

twitter
8/8

चित्रपटातील काही कलाकारांचे प्रदर्शनापूर्वीच निधन झाले होते. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, चित्रपटातील मुख्य अभिनेता संजीव कुमार यांचे प्रदर्शनाच्या एक वर्ष आधी निधन झाले. संजीव कुमार आणि निम्मी व्यतिरिक्त, चित्रपटात सिम्मी ग्रेवाल, प्राण, अमजद खान, अचला सचदेव आणि ललिता पवार यांसारखे प्रमुख कलाकार होते.

twitter