महाराष्ट्रातील सर्वात थरारक घाटात आहे कोकणातील दुसऱ्या क्रमाकांचे जगप्रसिद्ध हिल स्टेशन.
1/9समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर असलेला महाराष्ट्रातील सर्वात थरारक घाट आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या घाटात दडलेल्या एका छुप्या गावात जगप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात.
2/9आंबा घाट असे महाराष्ट्रातील या सर्वात थरारक घाटाचे नाव आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट जितका थरारक आहे तो तितकाच सुंदर आहे.
3/9आंबा घाटातून प्रवास करताना प्रवासी हरखून जातात. या घाटातील निसर्ग सौैंदर्य लक्ष वेधून घेते.
4/9आंबा हे ठिकाण कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे 65 किमी आणि रत्नागिरीपासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.
5/9आंबा घाट हे लोकप्रिय हिल स्टेशन देखील आहे. आंबा घाटातील अनेक गावांमध्ये पर्यटक थांबातात आणि येथील निसर्गसौंदर्यचाा आनंद लुटतात. मात्र, आंबा गाव सर्वात लोकप्रिय आहे.
6/9आंबा घाट हा समुद्रसपाटीपासून 2000 हजार फूट उंचीवर आहे. हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे . आंबा गाव हेच जगप्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
7/9आंबा गाव अतिशय सुंदर आहे. हिरवेगार डोंगर रस्त्याच्या भोवताली खोल दरी. इथं नेहमी धुकं असत. यामुळे आंबा गावात फिरताना केरळचा फिल येतो.
8/9आंबा गावात अनेक रिसॉर्ट आणि होम स्टे आहेत. अनेक पर्यटक आंबा गावात फिरण्यासाठी येतात. आंबा हे थंड हवेचे हिल स्टेशन आहे.
9/9पश्चिम घाटामध्ये रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातून प्रवास करताना उटी मसुरी रोडचा फिल येतो. यामुळे अनेक पर्यटक निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आंबा घाटातून प्रवास करतात.