25 पैशांत 1 KM धावणार; जबरदस्त मायलेज देणारी भरतातील पहिली सुपर स्पोर्ट्स बाईक; किंमत जाणून लगेच बुकिंग कराल

भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच झाली आहे. सिंगल चार्जमध्ये 172 KM रेंज मिळते. 

वनिता कांबळे | Jul 05, 2025, 09:12 PM IST
twitter

Matter Aera Geared Electric Bike:  दिल्लीतील एका स्टार्ट अप कंपनीने जबरदस्त मायलेज देणारी सुपर स्पोर्ट्स बाईक लाँच केली आहे. ही भारतातील पहिली गियर असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. स्पोर्टी लुकसह या बाईकमध्ये जबरदस्त फिचर्स मिळतात. जाणून घेऊया या बाईकचे बेस्ट फिचर्स आणि किंमत. 

 

1/8

जबरदस्त मायलेज देणारी भरतातील पहिली सुपर स्पोर्ट्स बाईक लाँच झाली आहे. ही बाईक फक्त 25 पैशांत 1 KM धावणार आहे.   

twitter
2/8

 या बाईकमध्ये तीन राईड मोड आहेत, जे  4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहेत. हे एकूण 12 गियर मोड कॉम्बिनेशन देते.   

twitter
3/8

या बाईकचे खास फिचर म्हणजे  यात हायपरशिफ्ट ट्रान्समिशन, जे इन-हाऊस विकसित 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. आतापर्यंत भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक बाईकमध्ये ते दिसले नाही.  

twitter
4/8

 Matter Aera या  इलेक्ट्रीक बाईकची एक्स-शोरूम किंमत 1,93,826  रुपये आहे.   

twitter
5/8

सिंगल चार्जमध्ये ही बाईक 172 किलोमीटरपर्यंतची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे.  

twitter
6/8

 या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक फक्त 25 पैसे प्रति किलोमीटर या किमतीत चालते. 

twitter
7/8

Matter Aera या  इलेक्ट्रीक बाईक  जी मॅटर नावाच्या स्टार्टअपने दिल्लीमध्ये लाँच केली आहे.

twitter
8/8

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सतत वाढत आहे. मॅटर एरा (Matter Aera) कंपनीने आपली इलेक्ट्रीक बाईक लाँच केली आहे.   

twitter