3,81,85,00,000 रुपयांची अफाट संपत्ती! पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व श्रीमंत उमेदवारांचा रेकॉर्ड सरकारमधील एका बड्या मंत्र्याच्या पत्नीने मोडला

आधी 38 कोटी संपत्ती होती. आता डायरेक्ट 3,81,85,00,000 रुपयांची अफाट संपत्ती झाली. सरकारमधील बड्या मंत्र्याची पत्नी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरली आहे.  पुणे, मुंबईच्या उमेदवारांचा रेकॉर्ड मोडला आहे.  

Vanita Kamble | Jan 09, 2026, 10:24 PM IST
twitter

Parisha Sarnaik Thane: महाराष्ट्रात 29 महापालिकासाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रचाराचा धुराळा उडाला असताना चर्चा रंगली आहे ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महाराष्ट्रातील श्रीमंत उमेदवारांची. 2,71,85,00,000 रुपयांची संपत्ती असलेले पुण्यातील भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. यांच्यापाठोपाठ पुण्यासह, मुंबईत अनेक श्रीमंत उमेदवार आहेत. या सर्व श्रीमंत उमेदवारांचा रेकॉर्ड सरकारमधील एका बड्या मंत्र्याच्या पत्नीने मोडला. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महिला उमेदवार ठरली आहे. यांच्याकडे 3810000000 रुपयांची अफाट संपत्ती आहे. 

1/8

मुंबई पुण्यातील गडगंड श्रीमंत उमेदवारांचा रेकॉर्ड एका महिला उमेदवाराने मोडला आहे. यांच्याकडे 3810000000 रुपयांची अफाट संपत्ती आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात श्रीमंत महिला उमेदवार सरकारमध्ये असलेल्यया एका बड्या मंत्र्यांची पत्नी आहे. 

twitter
2/8

पुण्यात भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 271.85 कोटींच्या आसपास आहे. तर, सायली वांजळे या दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 77.12 कोटींच्या आसपास आहे.   

twitter
3/8

 मुंबईत शिवसेना शिंदे गटातील उमेदवार समाधान सरवणकर यांची सद्याची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता तब्बल 46 कोटी 59 लाख रुपये आहे. त्यांची 2017 ला 9 कोटी 43 लाख रुपये होती. शिवसेना (ठाकरे) गटाच्या श्रद्धा जाधव यांची मालमत्ता 46 कोटी रुपये होती. त्यांची 2024 ला 44 कोटी रुपये मालमत्ता होती म्हणजे एका वर्षात साडेतीन कोटीने वाढली आहे.

twitter
4/8

मुंबई पुण्यातील श्रीमंत उमेदवारांचा रेकॉर्ड ठाण्यातील श्रीमंत उमेदवारे मोडला आहे.  ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात एकूण 649 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांनुसार त्यापैकी 114 उमेदवार कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे.

twitter
5/8

 मुंबई आणि पुण्यातील श्रीमंत उमेदवारांना परिषा सरनाईक यांनी मागे टाकले आहे. परिषा सरनाईक महाराष्ट्रातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या उमेदवार ठरल्या असून, त्यांच्या शपथपत्रात एकूण 381 कोटी रुपयांची मालमत्ता नमूद करण्यात आली आहे.  

twitter
6/8

परिषा सरनाईक या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी आहेत. परिषा सरनाईक या शिवसनेच्या तिकीटावर निवचणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

twitter
7/8

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. परिषा यांची संपत्ती 38 कोची 73 लाख होती. आता त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन संपत्ती 381 करोड़ 88 लाख इतकी झाली आहे. 

twitter
8/8

प्रताप सरनाईक यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकांसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 271 कोटी 18 लाख 39 हजार 647 रुपये एवढी दाखवली आहे.   

twitter