रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

तुम्हाला देखील रात्री केस धुण्याची सवय आहे

Nov 18, 2019, 08:22 AM IST

अनेकदा महिलांना सकाळी केस धुणं आवडतं नाही. कामाच्या गडबडीत सकाळी केस चांगल्यापद्धतीने धुता येत नाहीत याकारणाने अनेक महिला रात्री केस धुणं पसंत करतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रात्री केस धुतल्यामुळे अनेकदा नुकसान होऊ शकतं. रात्री केस धुतल्याने तुमच्या शरिराला आणि केसाला त्रास होऊ शकतो. 

1/5

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

केस जास्त तुटतात  रात्री केस धुतल्यामुळे केस आणि केसाची मुळे दोन्ही कमकुवत होतात. ओल्या केसांसोबत झोपल्यामुळे केस अधिक तुटतात. जेव्हा केस ओले असतात तेव्हा त्यामध्ये क्यूटिकल जास्त वर आलेलं असतं यामुळेच सर्वाधिक केस तुटतात.

2/5

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

केसांचा टेक्सचर खराब होतो  रात्री केस धुतल्यानंतर जर तुम्ही ओल्या केसांसोबतच झोपलात तर केसांना वेगळाच आकार प्राप्त होतो. यामुळे सकाळी उठल्यावर केसांचा टेक्सचर अतिशय विचित्र होतो.

3/5

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

केसांचा गुंता होतो रात्री केस धुतल्यामुळे आपण केसांत फणी घालत नाही. केस तसेच बांधून ठेवले जातात अथवा मोकळे सोडले जातात यामुळे केसांचा गुंता होण्याची दाट शक्यता असते. सकाळी सुकलेल्या केसांचा अधिक गुंता झालेला पाहायला मिळतो. असे केस विंचरताना अधिक तुटतात. 

4/5

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

रात्री केस धुतल्यामुळे कोंडा (Dandruff) होतो  रात्री केस धुतल्यामुळे फंगस म्हणजे बुरशी, कोंडा, केस गळणे आणि संक्रमण सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. केस ओले असल्यामुळे बुरशी वाढण्यास मदत होते. 

5/5

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

रात्री केस धुण्याचे 5 दुष्परिणाम

ऍलर्जी होण्याची शक्यता  रात्री केस धुवून तसेच झोपल्याने सर्दी-खोकला होण्याची दाट शक्यता असते. डोकं जड होणे,सर्दी होण्यासारखे त्रास होऊ शकतात. ओल्या केसांमध्ये धूळ लवकर चिकटते त्यामुळे केस अधिक खराब होतात. केस धुतल्यानंतर ते लगेच कोरडे करणं आवश्यक असते.