टीम इंडियासाठी एक दोन नाही तर तब्बल 5 धोक्याचे इशारे, वेळीच सुधारले नाही तर सेमीफायनलमध्ये होणार पराभव
IND VS ENG : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. भारतीय फॅन्सचं लक्ष हे दुसऱ्या सेमीफायनलवर असून ज्यात भारत विरुद्ध इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात सामना होणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला स्वतःच्या कमतरतेवर काम करावं लागणार आहे. अन्यथा इंग्लंड भारतीय संघाच्या या कमतरतेचा फायदा उचलून सेमीफायनलमध्ये त्यांचा पराभव करू शकतं.
Pooja Pawar
| Mar 03, 2026, 04:56 PM IST
1/7

2/7

3/7

टीम इंडियाची सर्वात मोठी कमतरता ही ओपनिंग पार्टनरशिप आहे. स्पर्धेत सुरुवातीला अभिषेक आणि ईशान या सलामी जोडीने टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात केली होती. मात्र विरोधी संघांना ऑफ स्पिनच्या हत्याराने ही जोडी तोडण्यात यश आलं होतं. संजू सॅमसनची एंट्री मागील काही सामन्यात झाली मात्र तरीही पॉवर प्लेमध्ये विकेट्स पडताना दिसल्या. सलामी जोडीकडून टीम इंडियाला अद्याप अजून चांगली पार्टनरशिप मिळालेली नाही.
4/7

5/7

6/7

अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा टीम इंडियाची कमजोरी आहे. आतापर्यंत 6 सामन्यात अभिषेक आणि सूर्याने आपल्या फलंदाजीने एक अर्धशतक ठोकले. दोघांच्या लवकर बाद झाल्याने टीम इंडियाच्या मिडिल ऑर्डरवर बरच प्रेशर येतं. अभिषेक शर्मा मागच्या सामन्यात 15 धावाकरून आउट झाला. सुरुवातीला तो सलग तीन सामन्यात डकआउट झाला होता.
7/7
