53 मिनिटांचा प्रवास, मुंबई पासून फक्त 36 KM अंतरावर आहे महाबळेश्वरला टक्कर देणारे सिक्रेट हिल स्टेशन

मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले छुप हिल स्टेशन.  

Vanita Kamble | Jan 06, 2026, 11:13 PM IST
twitter

Mumbai Hidden Hill Station Yeoor Hills : गुलाबी थंडीत फिरण्याची मजा काही औरच... पण, लांब ठिकाणी किंवा एखाद्या हिल स्टेशनला फिरायला जायचं म्हंटल की कमीत कमी 3 ते 4 दिवसांची सुट्टी पाहिजे. अनेकदा सुटी मिळते पण बजेट बसत नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर एक सिक्रेट हिल स्टेशन आहे. इथं अगदी एका दिवसातही तुम्ही फिरुन याल. इथं जायला फार खर्च येणार नाही. 

1/11

मुंबईजवळ एक सिक्रेट हिल स्टेशन आहे. मुंबईपासून फक्त 36 KM असलेले हे हिल स्टेशन महाबळेश्वरला टक्कर देते. इथं पोहचण्यासाठी तुम्हाला फक्त 53 मिनिटे लागतील. जाणून घेऊया हे हिल स्टेशन कोणते?       

twitter
2/11

सुंदर पर्वत रांगेत असलेले हे पर्यटन स्थळ आपल्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालते. पावसाळ्यात येथे अल्हाददायक वातावरण असते. तितकीच येथे मनमोहक थंडी आहे. गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येतात. 

twitter
3/11

 येऊरमध्ये सात आदिवासी पाडे आहेत. सुमारे साडेतीन हजार इतके आदिवासी नागरिक येथे राहतात. येऊलमध्ये अनेक खाजगी बंगले तसेच रिसॉर्ट आहेत. अनेक पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतात आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटतात.   

twitter
4/11

  मुंबईचे हे सिक्रेट हिल स्टेशन आहे येऊर हिल्स (Yeoor Hills).... येऊर हे मुंबईजवळचे सर्वात लहान पण तितकेच लोकप्रिय हिलस्टेशन आहे. 

twitter
5/11

येऊरच्या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती देखील पहायला मिळतात.  येऊरच्या जंगलात वन्य प्राण्यांचा देखील वावर आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल हे सध्या चांगलेच लोकप्रिय होत आहे.

twitter
6/11

 थेट मुंबईतून प्रवेस नसल्यामुळेच येऊर हिल्स हे मुंबईच्या गर्दीपासून अलिप्त झाले आहे. यामुळे ठाणे महापालिका परिसरात येणारे निसर्गरम्य येऊर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. 

twitter
7/11

येऊरचे जंगल हे मंबईच्या  नॅशनल पार्क पासून ठाण्याच्या येऊर पर्यंत पसरलेले आहे. मात्र, येऊरला जाण्यासाठी बोरीवली नाही तर ठाण्यातून प्रवेश दिला जातो.

twitter
8/11

येऊरचे जंगल हे मंबईच्या  नॅशनल पार्क पासून ठाण्याच्या येऊर पर्यंत पसरलेले आहे. मात्र, येऊरला जाण्यासाठी बोरीवली नाही तर ठाण्यातून प्रवेश दिला जातो.

twitter
9/11

येऊर हिल्स हे मुंबईचे मिनी महाबळेश्वर आणि मिनी माथेरान म्हणून ओळखले जाते. मुंबईच्या गर्दीपासून हे ठिकाण अलिप्त आहे.   

twitter
10/11

मुंबईच्या या सिक्रेट हिल स्टेशनपर्यंत पोहचायचे असेल तर मुंबईच्या बाहेर जावे लागते. मुंबईलगत असलेल्या या हिलस्टेशनला ठाण्यातून प्रवेश दिला जातो.   

twitter
11/11

मुंबईतील हे छुप हिल स्टेशन मुंबईच्या बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कचाच भाग आहे. मात्र, या हिलस्टेशनला जायचे असले तर इथे जाण्यासाठी मुंबईतून प्रवेश नाही. 

twitter