PHOTO : विवाहित नागार्जुनसोबत होतं 54 वर्षीय अभिनेत्रीचं अफेयर, अखेर 27 वर्षांनी पुन्हा आले एकत्र; तर अजय देवगणमुळे केलं नाही लग्न

ही 54 वर्षीय अभिनेत्री आजही अविवाहित आहे. विवाहित नागार्जुनसोबत त्याच्या अफेयरची चर्चा झाली होती. आज 27 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. तर अजय देवगणमुळे तिचं लग्न झालं नाही, असं म्हणतात. 

Neha Choudhary | Nov 04, 2025, 09:34 PM IST
twitter
1/8

Tabu Birthday

बॉलिवूडमधील ही दमदार अभिनेत्री वयाच्या 54 वर्षीय तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करते. नागार्जुनसोबत तिचं अफेयर तब्बल 15 वर्ष होतं, पण त्यांचं ब्रेक झालं. आज 27 वर्षांनी ते पुन्हा एकत्र येणार आहेत.

twitter
2/8

Tabu networth

माचीस, कालापानी, अस्तित्व, चांदनी बार, हैदर, दृश्यम, अंधाधुन या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री आहे तब्बू. सिनेसृष्टीमध्ये तिने उंच शिखर गाठलं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात ती वयाच्या 54 वर्षी एकटीच आहे. 

twitter
3/8

Tabu Property

असं नाही की तब्बूचं नाव कोणाशी जोडलं गेलं नाही. प्रेम चित्रपटादरम्यान संजय कपूरसोबत तिचं नाव जोडल्या गेलं होतं. पण या चित्रपटाचे शूटिंग संपल्यासोबतच त्यांच्या नात्यालाही ब्रेक लागला. 

twitter
4/8

tabu upcoming film

पुढे तब्बूचं नातं हे फिल्ममेकर साजिद नाडियादवालासोबत होतं. झालं असं की, साजिदची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या भारती ही तब्बूची मैत्रिण होती. दिव्याचा निधनानंतर साजिदला तब्बूने आधार दिला आणि त्याच वेळी ते जवळ आलेत. पण साजिद दिव्याला विसरू शकत नव्हता. म्हणून अखेर तब्बू या नात्यातून बाहेर पडली.

twitter
5/8

Tabu Affairs

तब्बूच्या आयुष्यानंतर विवाहित साऊथ स्टार अक्किनेनी नागार्जुन याची एन्ट्री झाली. या नात्यात असताना तब्बूने मुंबई सोडून हैदराबादला राहायला गेली आहे. हे नातं तब्बल 15 वर्ष होतं, पण नागार्जुन त्याच्या पत्नीला सोडणार नाही हे कळल्यावर ती या नात्यातूनही बाहेर पडली. वयाच्या 54 वर्षीय ती नागार्जुनच्या प्रेमात अविवाहित राहिली असं म्हणतात. 

twitter
6/8

Tabu Love Life

एका मुलाखतीत तब्बूने ती अविवाहित राहण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली होती, अजय देवगणमुळे तिचं कधीही लग्न होऊ शकलं नाही. ती म्हणाली की, अजय आणि ती कॉलेज फ्रेंड आहेत. ती गंमतीत म्हणाली की, मी सिंगल राहिली यामागे कारण अजय देवगण आहे. कॉलेजमध्ये तिच्याजवळ कोणी मुलगा आला तर अजय देवगण त्याला मारहाण करायचा. 

twitter
7/8

Tabu Ajay Devgn Friendship

तब्बू ही हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री असून आज एका चित्रपटासाठी ती 2 ते 4 कोटी रुपये मानधन घेते. तिची एकूण संपत्ती ही 52 कोटींच्या घरात आहे. तब्बूकडे तीन आलिशान घरं असून मुंबई, गोवा आणि हैदराबादमध्ये कोट्यवधींचा बंगला आहेत.

twitter
8/8

Bollywood News

नागार्जुन त्याचा 100 वा चित्रपट करणार असून त्याचे नाव किंग 100 असं ठेवण्यात आलंय. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बू आणि नागार्जुन तब्बल 27 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. 

twitter