मुंबई-पुणे महामार्गावर 61 KM लांब वाहनांच्या रांगा; पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी 3 पर्यायी मार्ग, जाणून घ्या कुठून कुठे कसं जायचं?
पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी 3 पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबईकडे जाताना आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं मुंबई-पुणे महामार्ग ठप्प झाला. मुंबई-पुणे महामार्गावर 61 KM लांब वाहनांच्या रांगा लागल्या. मुंबईकडे जाणारी वाहूतक अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय.. अद्यापही वाहतूक कोंडी न सुटल्यानं ट्रान्सपोर्टवाल्यांचं देखील मोठं नुकसान झाले आहे. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी 3 पर्यायी मार्ग सुचण्यात आले आहेत.



पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमध्ये ट्रान्सपोर्टचे शेकडो ट्रकही अडकून पडले आहेत. 24 तासांहून अधिक काळ अनेक ट्रकचालक रस्त्यावरच ताटकळलेत. तहान भुकेने व्याकूळ झालेल्या या ट्रक चालकांची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यांनी थेट एक्सप्रेस हायवेवरच जेवण तयार केलं, मात्र पाण्याअभावी या ट्रकचालकांचे हाल झाले.




