Republic Day : 'बलसागर भारत होवो...' देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा

अंगावर काटा आणणारे ते क्षण

Jan 26, 2022, 11:18 AM IST

देश 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. दिल्लीच्या राजपथ ते लाल किल्ल्यापर्यंत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू झाला आहे. प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्याचा अमृतोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करत देशात 73 वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा  होत आहे.  या सोहळ्याचे काही खास फोटो...

1/5

राजपथावर परेड सुरू झाली आहे. ज्यामध्ये बटालियनचे अधिकारी आणि सैनिक सामील आहेत. 

2/5

सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना अभिवादन केले.  

3/5

ध्वजारोहणानंतर शहिदांना मानवंदना देण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत 27,000 हून अधिक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.  

4/5

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उपस्थिती लावली.   

5/5

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.