Toilet Scam : 9 कोटींचा शौचालय घोटाळा; मंजुर झालेला पैसे गेले कुठे?
केंद्र सरकारनं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात मागेल त्याला शौचालय देण्याची योजना सुरू केलीय. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला 12 हजारांचं अनुदान दिलं जातं. संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 7 हजार 223 शौचालयं मंजूर करण्यात आली. मात्र दीड वर्ष उलटली तरी लाभार्थ्यांना पैसे मिळालेलेच नाहीत.
Toilet Scam In Sambhajinagar : संभाजीनगरात तब्बल 9 कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. येथे कागदोपत्री लाभार्थ्यांना शौचालयांचे पैसे दिल्याचं दाखवण्याच आलंय. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या हाती दमडीही पडलेली नाही. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. केंद्र सरकारनं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात मागेल त्याला शौचालय देण्याची योजना सुरू केलीय. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला 12 हजारांचं अनुदान दिलं जातं. संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 7 हजार 223 शौचालयं मंजूर करण्यात आली. मात्र दीड वर्ष उलटली तरी लाभार्थ्यांना पैसे मिळालेलेच नाहीत. विशेष म्हणजे ऑनलाईन पोर्टलवर हे पैसे वितरीत झाल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे आपले पैसे कुठे गेले असा सवाल, इथले ग्रामस्थ करत आहेत.
झी 24 तासनं या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय. ग्रामस्थांनी अनुदानाचे पैसे मिळवण्यासाठी मुंबई कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी जिल्हा परिषदेकडे पैसे आल्याचं सांगितलं तर जिल्हा परिषदेनं पंचायत समितीकडे बोट दाखवले. पंचायत समितीने मात्र पैसेच आलेलेच नाहीत असं उत्तर दिलंय. सरकार दरबारी उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं लोकांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळतोय. सामान्यांच्या अनुदानावर नेमका कुणी डल्ला मारला? याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे.