close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लेहमध्ये 'आदी महोत्सवाला' सुरुवात

 शनिवारी लेह येथे 'आदी महोत्सवा'ची सुरूवात करण्यात आली. 

Aug 18, 2019, 08:14 AM IST

काश्मीरमध्ये लागू असलेले विशेषाधिकाराचे वादग्रस्त अनुच्छेद ३७० रद्द करून सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. शनिवारी लेह येथे 'आदी महोत्सवा'ची सुरूवात करण्यात आली. हा महोत्सव तब्बल ९ दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 'आदी महोत्सवा'चे उदघाटन राज्यपाल सत्यपाल मलिक आणि केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते करण्यात आले.

1/3

लेहमध्ये 'आदी महोत्सवाला' सुरुवात

लेहमध्ये 'आदी महोत्सवाला' सुरुवात

लेहच्या पोलो मैदानात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी, संस्कृती, शिल्पकला, औषधी वनस्पतींचे संरक्षण अन्य गोष्टींना व्यवसायिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून केला जातो. 

2/3

आर्थिक भरभराटीची संधी मिळेल

आर्थिक भरभराटीची संधी मिळेल

गृहमंत्री आमित शाह यांनी पत्राच्या माध्यमातून आपला संदेश लडाखच्या जनतेला दिला. अमित शाह म्हणाले की 'आदी महोत्सवामध्ये लोकनृत्य, ललित कला, त्याचबरोबर आदिवासी हस्तकला आयुर्वेदीक औषधे इत्यादींचे प्रदर्शन भरवले जाते. या माध्यमातून आदिवासींना आर्थिक भरभराटीच्या संधी देखील प्राप्त होण्यास मदत होते. '  

3/3

लेहमध्ये 'आदी महोत्सवाला' सुरुवात

लेहमध्ये 'आदी महोत्सवाला' सुरुवात

या महोत्सवात तब्बल २० राज्यातील १६० कलाकार भाग घेणार आहेत.