Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 6 July 2026 in Marathi : वैदिक पंचांगानुसार आज चंद्र कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात आहे. आज गुरु -पुष्य अमृत योग आहे. तर सूर्य राहूच्या आर्द्रा नक्षत्रात आहे. ग्रहांची ही स्थिती मेष ते मीन राशीच्या लोकांशी असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
1/12संवाद साधताना अडथळे येतील. करिअरमध्ये बंद झालेले जुने मार्ग पुन्हा शोधणार आहात. वादग्रस्त मुद्दे बाजूला सारून संवाद साधा. कौटुंबिक शांत आणि अनुकूल राहिल. आर्थिक प्रगतीसाठी ऊर्जा मिळणार आहे. मोठे निर्णय घ्या.
2/12संभाषण आणि करिअरबद्दल दिलासा मिळणार आहे. करिअरसाठी आजचा दिवश उत्तम असणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. इतरांच्या बोलण्याला प्राधान्य द्या. आरोग्य उत्तम असेल. संध्याकाळनंतर महत्त्वाची चर्चा टाळा.
3/12तुमच्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आर्थिक व्यवहारा उत्तम तर कौटुंबिक चर्चांना गती मिळणार आहे. दिवसभर उत्साही वातावरण असणार आहे. धार्मिक कार्यात सहभाग घ्या. कोणताही मोठी निर्णय टाळा.
4/12आजचा दिवस तुमच्यासाठी वरदान असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक व्यावहारिक आणि बुद्धिमान ऊर्जा राहणार आहे. आज तुमच्या शब्दांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही गहन संवाद होणार आहे. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. पण संध्याकाळनंतर तुमचे मन थोडे जड वाटणार आहे.
5/12आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मित्रांचा पाठिंबा मिळणार आहे. आध्यात्मिक ऊर्जा आज तुमच्यासोबत असणार आहे. जोडीदारासोबतचा संवाद तुम्हाला दिलासा देणार आहे. करिअरमघ्ये मजबुती मिळमार आहे. संध्याकाळानंतर एकटेपणा जाणवेल.
6/12आजचा दिवस अत्यंत दिलासादायक असणार आहे. प्रगतीचे मार्ग आजपासून उघणार आहेत. जुनी आठवण किंवा जुन्या ओळखी व्यक्ती आठवण त्रासदायक ठरेल. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या गोष्टीची माहिती मिळेल. करिअरमध्ये ऊर्जा असणार आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पात गुंतवणूक आज टाळा.
7/12करिअरमध्ये आज दिलासा मिळणार आहे. राजेशाही अनुभव तुम्हाला मिळणार आहे. मुलांसोबत चांगला वेळ घालवणार आहात. मनोरंजनासाठी वेळ काढा. करिअरसंबंधी कोणताही मोठा निर्णय टाळा.
8/12आजचा दिवस भाग्य आणि कौटुंबिक दोन्हीसाठी चांगला असणार आहे. नशिबातील अडथळे दूर होणार आहेत. काही जुन्या कामांचा मार्ग आज अचानक मोकळा होणार आहे. संध्याकाळनंतर घरात कोणतेही जुने मुद्दे उपस्थित करणे नुकसानदायक ठरणार आहे.
9/12आजचा दिवस गुप्त बाबी आणि चर्चा या दोन्हीसाठी सकारात्मक असणार आहे. कोणत्याही जुन्या आणि न सुटलेल्या विषयावर उत्तर मिळणार आहे. शेजाऱ्यासोबत वाद टाळा. तुमच्या आरोग्याला जोरदार ऊर्जा मिळणार आहे. पण संध्याकाळनंतर कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका.
10/12आजचा दिवस भागीदारी आणि एकांत या दोन्ही बाबतीत फायदेशीर आहे. अपूर्ण राहिलेले जुने करार पुढे ढकला. तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. पण संध्याकाळनंतर भागीदारीवरील कोणतीही मोठी करु नका.
11/12आजचा दिवस व्यक्तिमत्त्व आणि आरोग्य या दोन्ही बाबीसाठी सकारात्मक असणार आहे. आजपासून आरोग्याच्या कोणत्याही समस्या दूर होणार आहे. एक प्रतिष्ठित ऊर्जा आणणार आहे. पण संध्याकाळनंतर तुमचे मन अस्वस्थ असणार आहे. त्या वेळी एकांतात बसून ध्यान करा.
12/12आजचा दिवस प्रत्येक कार्य पूर्ण करण्यास मदत मिळत आहे. सर्व अडथळे आज दूर होणार आहे. एक नवीन दिशा मिळणार आहे. प्रेमालाही एक सकारात्मक बाजू मिळणार आहे. एकांतात मनाला गहन शांती मिळणार आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)