Aajche Rashi Bhavishya 7 July 2026 : आज भद्र राजयोगामुळे मिथुन, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार भाग्याची साथ, पाहा 12 राशींचे राशीभविष्य

Written ByNeha Choudhary
Published: Jul 07, 2026, 07:26 AM IST|Updated: Jul 07, 2026, 07:26 AM IST

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 7 July 2026 in Marathi : वैदिक पंचांगानुसार आज अनेक ग्रहांचा दुर्लभ संयोग जुळून आला आहे. आज गणेशाचा दिवस असल्याने मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

मेष (Aries Zodiac) 1/12

मेष (Aries Zodiac)

 

आज तुम्हाला असा निर्णय घ्याला लागू शकतो ज्याचा परिणाम येत्या काही दिवसांपर्यंत दिसून येईल. हा निर्यण करिअर, व्यवसाय किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीविषयी असू शकतो. भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती ऐवजी अनुभवानुसार निर्णय घ्या. एखादी व्यक्तीची भेट प्रगतीची मार्ग खुला करेल. आर्थिक बाबीमध्ये फायदेशीर निर्णय घ्या. 

वृषभ (Taurus Zodiac) 2/12

वृषभ (Taurus Zodiac)

 

इतक्या दिवसांपासून डगमगलेला आत्मविश्वास परत मिळणार असून तुम्हाला एक आशेचा किरण दिसेल. कामातील कठोर परिश्रमांचे झीज होणार आहे. करिअर किंवा व्यवसायाबद्दल शुभ संकेत मिळणार आहेत. तुमच्या प्रयत्नांतून भविष्यात मोठे फायदे मिळणार आहेत. आर्थिक बाबतीत घाईने निर्णय टाळा. आज प्रिय व्यक्तीचा पाठिंबा तुम्हाला पाठबळ देणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)  3/12

मिथुन (Gemini Zodiac)

एकट्याने काम करण्यापेक्षा लोकांना सोबत घेऊन काम करणे फायदेशीर ठरणार आहे. एक नवीन भागीदारी होणार असून ती भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी संवाद भविष्यासाठी उत्तम असणार आहे. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत. नात्यांमधील मोकळा संवाद गैरसमज दूर करणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)  4/12

कर्क (Cancer Zodiac)

 

तुम्हाला काही काळापासून होणाऱ्या त्रासातून सुटका होणार आहे. कोणताही घाईचा निर्णय घेऊ नका. आर्थिक किंवा कौटुंबिक गोष्टीत संयम ठेवा. आज घाईघाईने प्रतिक्रिया देऊ नका. जुन्या विषयातील नवीन माहिती तुमच्या विचारात बदल घडविणार आहे. शांत आणि संयमामुळे आजचा दिवस उत्तम राहिल. 

सिंह (Leo Zodiac) 5/12

सिंह (Leo Zodiac)

 

आज एखाद्या गोष्टीची सुरुवात मनापासून झाल्या नाहीत तरी निराश होऊ नका. एक छोटीशी चूक किंवा अपूर्ण तयारी तुमच्या कामात अडथळे आणतील. नवीन जबाबदारी किंवा संधीबद्दल गांभीर्य दाखवा. एखादी चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. सकारात्मक विचार मोठे फायदे देणार आहेत. 

कन्या (Virgo Zodiac)   6/12

कन्या (Virgo Zodiac)

 

एखादी नवीन संधी किंवा प्रकल्पबद्दल आज विचार करु शकता. भूतकाळातील अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. बऱ्याच काळापासून ज्या बदलाची तयारी करत आहात, त्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल. करिअर किंवा आर्थिक बाबींमधील आजची घडामोड भविष्यात परिणाम देतील. या काळात संयम आणि दूरदृष्टी तुमची सर्वात मोठी संपत्ती असणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  7/12

तूळ (Libra Zodiac)

 

कुटुंब किंवा नातेसंबंधांमधील एखादा किरकोळ मतभेद जास्त वाढू देऊ नका. संवाद आणि सामंजस्याने वागणे हिताचे ठरणार आहे. आपला मुद्दा पटवून देण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचा भावनांना वाव द्या. यामुळे नातं मजबूत होईल. एखाद्या कामात किरकोळ अडथळे जाणवतील. परंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचा आदर फायदेशीर ठरणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

 

तुमच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी आज तुम्ही एक उत्तम पाया रचणार आहात. त्यासाठीची संधीही तुम्हाला मिळणार आहे. नवीन नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक यापैकी कुठली तरी बाब तुमची जबाबदारी वाढविणार आहे. योग्य वेळी योग्य विचार तुमच्यासाठी इतरांपेक्षा पुढे नेणार. भविष्याबद्दलचा तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 9/12

धनु (Sagittarius Zodiac)

 

ज्या परिस्थितीतून तुम्ही खूप काळापासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात त्यात आज सकारात्मक बदल दिसणार आहे. करिअर, शिक्षण किंवा व्यवसायातील कामं थांबवू नका. एक नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. सहकारी, मित्र किंवा वरिष्ठांकडून मिळणारा पाठिंबा सकारात्मक बदल घडविणार आहे. एखादी चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत करणारा ठरणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   10/12

मकर (Capricorn Zodiac)

 

तुम्हाला एक महत्त्वाचा निर्णयात स्पष्टता मिळणार आहे. पूर्वी गोंधळून टाकणाऱ्या गोष्टीतून मार्ग सोपा होणार आहे. नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक बाबींमध्ये, घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी सखोल आणि विचारपूर्वक निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आणि शिस्त आज तुमच्यासाठी मोठी ताकद ठरणार आहे. जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

 

आज येणाऱ्या कुठल्याही संधीकडे दुर्लक्ष करु नका. करिअर, व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे. अगदी नवीन नोकरीच्या संधीकडेही सकारात्मक विचार करुन निर्णय घ्या. तुमच्या दीर्घकालीन प्रयत्नांना योग्य दिशा आणि यश मिळणार आहे. एखादं यश किंवा सकारात्मक गोष्ट तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत करणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  12/12

मीन (Pisces Zodiac)

 

जुने वाद, गुंतागुंत किंवा गैरसमज दूर करण्याचा हा उत्तम दिवस आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीतून स्पष्टता येणार आहे. कुटुंब, मालमत्ता किंवा भविष्यातील योजनांशी संबंधित निर्णय घेताना इतरांशी संवाद साधून निर्णय घ्या. अनावश्यक स्पर्धा आणि तणावापासून दूर रहा. कौटुंबिक पाठिंबा मिळणार आहे. दीर्घकाळापासूनची चिंता कमी होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)