Acer ने लाँच केला आतापर्यंतचा सर्वात इको-फ्रेंडली लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Acer Aspire Vero : Acer कंपनीने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतात Aspire Vero (2023) लॅपटॉप लॉन्च केला आहे. हा त्यांचा लेटेस्ट इको-फ्रेंडली लॅपटॉप असल्याचा कंपनीचा दावा आहे. यासोबत कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे विकल्या जाणार्‍या प्रत्येक लॅपटॉपसाठी एक झाड लावण्याची शपथ घेतली आहे.  

Jun 06, 2023, 18:27 PM IST
1/7

acer green PC

सोमवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी Acer ने भारतात आपला लेटेस्ट इको-फ्रेंडली लॅपटॉप Aspire Vero 2023 लाँच केला आहे. कंपनीने हा लॅपटॉप पर्यावरण असल्याचा दावा केला आहे.

2/7

acer laptop production

Acer ने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतात आपला नवीन इको-फ्रेंडली लॅपटॉप Aspire Vero 2023 सादर केला आहे. Acer हा लॅपटॉप तयार करताना 30 टक्के पीसीआर म्हणजेच (पोस्ट-कंझ्युमर रिसायकल) मटेरियल वापरले असल्याचे म्हटलं आहे. या नवीन लॅपटॉपचे कीकॅप्स देखील ५० टक्के पीसीआर मटेरियलपासून बनवण्यात आले आहेत. 

3/7

Acer Aspire Vero display

Acer Aspire Vero चा हा लॅपटॉप ग्रीन पीसी म्हणून विकला जाणार आहे. यामध्ये यूजर्सना 14 इंचाचा 1080 पिक्सल डिस्प्ले मिळत आहे. लॅपटॉपच्या स्क्रीनचा अॅस्पेक्ट रेशो 16:9 आहे. हा डिस्प्ले Acer Technicolor Color Certification सह येणार आहे. 

4/7

acer processer

कंपनीना हा लॅपटॉप दोन प्रोसेसर पर्यायांसह लॉन्च केला आहे. या  लॅपटॉपमध्ये 13th Gen Intel Core i3/i5 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने लॅपटॉमध्ये 16 GB रॅम आणि 512 GB पर्यंत स्टोरेज देत आहे. तसेच हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

5/7

acer web cam

Acer आपल्या नवीन लॅपटॉमध्ये एमएस ऑफिस होम आणि स्टुडंट सबस्क्रिप्शन देखील देत आहे. यासोबत, यात 720 पिक्सेल इंटिग्रेटेड वेबकॅम मिळत आहे, जो टेम्पोरल नॉइज रिडक्शनला सपोर्ट करतो. ज्याच्या मदतीने युजर्संना सर्वोत्तम पिक्चर क्वालिटी मिळणार आहे.

6/7

acer laptop featurs

लॅपटॉपसोबत यूजर्सना स्टीरियो स्पीकर सेटअप आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळत आहे. याशिवाय, डेटा ट्रान्सफरसाठी तुम्हाला या डिव्हाइसमध्ये USB Type-C Thunderbolt 4 पोर्ट मिळत आहे.  यात एलईडी बॅकलिटसह कीबोर्ड आहे आणि काचेचा ट्रॅकपॅड देखील आहे. ट्रॅकपॅड मल्टी-जेश्चर आणि टू-फिंगर स्क्रोलिंगला सपोर्ट करतो. याशिवाय या नवीन लॅपटॉपमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

7/7

acer laptop price

कंपनीने Acer Aspire Vero (2023) ची सुरुवातीची किंमत 49,999 रुपये निश्चित केली आहे. कंपनीच्या वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही हा लॅपटॉप फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वरून देखील खरेदी करू शकता. तसेच 5 जून ते 9 जून दरम्यान लॅपटॉपच्या खरेदीवर तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळेल. (सर्व फोटो - acer.com)