close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अजब गजब! २० वर्षांनंतर झाडांपासून मिळणार मांस, वाचा काय आहे सत्य

२०४० पर्यंत मांस जनावरांपासून नाही, तर चक्क झाडांपासून मिळण्याची शक्यता आहे.  

Jun 19, 2019, 10:54 AM IST

मुंबई : खवय्यांच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेल्समध्ये अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ असतात. अशा खाद्यपदार्थांमध्ये मांसाहाराला पसंती देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, याच मांसाहाराचा पसंती देणाऱ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा बदल येत्या काही वर्षांमध्ये घडणार आहे. ज्यामुळे मांसाहारप्रेमींना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 
येत्या २० वर्षांमध्ये झाडांपासून मांस मिळू शकेल. २०४० पर्यंत खाद्यप्रेमींना मांसाहार पूर्णपणे नाही, तर शक्यतो ६० टक्क्यांपर्यंत मांस मिळणे बंद होणार असल्याचे एका अहवालात सांगितले आहे. २०४० पर्यंत मांस जनावरांपासून नाही, तर चक्क झाडांपासून मिळण्याची शक्यता आहे.  

1/4

मांसाहरी खाणाऱ्यांना होणारे आजार

मांसाहरी खाणाऱ्यांना होणारे आजार

मीडिया रिपोर्टनुसार, २०४० पर्यंत ३५ टक्के लोकांना जनावरांचे मांस, तर २५ टक्के झाडांपासून मांस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. झाडांपासून तयार करण्यात आलेले मांस आरोग्यास अत्यंत पौष्टिक असेल. ज्यामुळे मांसाहार करणाऱ्यांमध्ये होणाऱ्या आजाराचे प्रमाण कमी होईल.    

2/4

झाडांपासून तयार करण्यात येणाऱ्या मांसाची चव कशी असेल?

झाडांपासून तयार करण्यात येणाऱ्या मांसाची चव कशी असेल?

झाडांपासून तयार करण्यात येणाऱ्या मांसाची चव ही अगदी जनावरांच्याच मांसाप्रमाणे असेल. हे मांस शरीरास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवणार नाही.  

3/4

झाडापासून तयार होणाऱ्या मांसाचे महत्त्व

झाडापासून तयार होणाऱ्या मांसाचे महत्त्व

जनावरांच्या मांसातून मिळणारे सर्व पोषक घटक वृक्षांपासून मिळणाऱ्या या मांसात असतील. जनावरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

4/4

मांस उद्योगांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

मांस उद्योगांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

देशभरात मांसासाठी अनेक जनावरांना पाळले जाते. त्यामुळे या प्रकरणाला उद्योकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संशोधकांनी सादर केलेल्या अहवालानुसार पर्यावरणावरदेखील याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे