`अग्गबाई सासूबाई` आता नव्या ढंगात `अग्गबाई सूनबाई`

Dakshata Thasale Wed, 24 Feb 2021-3:53 pm,

'अग्गबाई सासूबाई' मालिकेत सोहमची भूमिका अभिनेता आशुतोष पत्की साकारत होता. 'बबड्या' या नावामुळे सगळीकडेच त्याची चर्चा झाली. 

मालिकेत आता शुभ्रा आणि सोहमचं पात्र बदललं जाणार आहे. या ठिकाणी आता अद्वैत दादरकरची वर्णी लागणार अशी चर्चा आहे. 

'अग्गबाई सासूबाई' मालिकेत सासू-सुनेचं अनोखं नातं दाखवण्यात आलं होतं. शुभ्रा आणि आसावरीची भूमिका तेजश्री प्रधान आणि निवेदिता सराफ साकारत होत्या 

शुभ्राची भूमिका आता उमा ऋषिकेश साकारत आहे. आता कुललकर्णींच्या घरात वेगळी सून पाहायला मिळणार आहे. 

शुभ्राची भूमिका आता वेगळ्या रुपात दिसणार आहे. शुभ्राला बाळ झालं आहे. 

काही काळानंतर कुलकर्णी घरात बरेच बदल दिसून येतात. आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे . पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता office successfully हातात घेतले आहे

तीच्या सोबत तिचा सोहम आता Right hand म्हणून काम बघतोय. तसेच अभिजित राजेंनी त्यांच्या style ने स्व खुषीने घर सांभाळायला घेतले आहे . 

शुभ्रा ने आई पण स्वीकारून तिच्या मुलाची म्हणजे बबडूची जबाबदारी सांभाळत नव्या संसाराला सुरुवात केली आहे .

 अश्या ह्या कुलकर्णी कुटुंबात शुभ्राला संसाराच्या काही Tips देत आसावरी पुन्हा शुभ्राला Independent करण्यच्या मार्गावर हे कथानक आधारले आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link