कान्स 2025 रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा देसी तडका; सिंदूर ठरलं चर्चेचा विषय

Aishwarya Rai Bachchan In Cannes: दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्या राय बच्चन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025'मध्ये उपस्थित राहिली आहे. रेड कार्पेटवर तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पाहूया तिचा हा खास आणि दिमाखदार लूक.

Intern | May 22, 2025, 12:37 PM IST
twitter
1/8

78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याची ही 22 वी उपस्थिती आहे. 2002 मध्ये तिने या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पदार्पण केले होते. यंदाही तिच्या ग्लॅमरस शैलीने सर्वांची मने जिंकली. तिच्या ठसठशीत देसी लूकमुळे रेड कार्पेटवर आणखीच ग्लॅमर निर्माण झाले.

twitter
2/8

कान्स सुरू झाल्यापासून चाहते तिच्या आगमनाची वाट पाहत होते. अखेर तिची एन्ट्री झाली आहे. तिच्या सौंदर्याची आणि स्टाइलची जोरदार चर्चा सुरू झाली. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले.

twitter
3/8

ऐश्वर्याच्या सौंदर्यावरून आणि तेजस्वी चेहऱ्यावरून नजर हटवणे अवघड झाले. मात्र सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला ते म्हणजे तिच्या कपाळावरील सिंदूर. तिच्या लूकमध्ये सिंदूराने विशेष लक्ष वेधले आणि सोशल मीडियावर अनेकांनी असे म्हटले की तिने यामाध्यमातून एक मूक पण ठाम संदेश दिला आहे.

twitter
4/8

एका नेटकऱ्याने लिहिले, 'ऐश्वर्याला काहीही न बोलता योग्य उत्तर द्यायचे असते, हे ती चांगलेच जाणते.' दुसऱ्याने म्हटले, 'यालाच म्हणतात 'ब्यूटी विथ ब्रेन'.' तिसऱ्याने लिहिले, 'तिने चिमूटभर सिंदूराची खरी किंमत दाखवून दिली आहे.' असे म्हणत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील अफवांना पूर्णविराम दिल्याचे लोक मानत आहेत.

twitter
5/8

या वर्षी ऐश्वर्याचा लूक प्रेक्षकांना विशेष भावला. तिने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. जी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केली होती. या साडीवर चांदीच्या जरीचे नक्षीकाम होते. जे तिच्या रॉयल लूकला अधोरेखित करत होते.

twitter
6/8

तिच्या लूकला शोभेल असा लेयर केलेला लाल रुबी नेकलेस, डार्क मरून रंगाची लिपस्टिक आणि मोकळ्या वेव्ही केसांनी अधिक गहिरा आणि आकर्षक टच दिला. तिच्या गळ्यात घातलेले पन्ना दागिने आणि मॅचिंग दुपट्टा यामुळे तिचा लूक पूर्ण झाला. पूर्ण बाह्यांचा ब्लाउज आणि कपाळावरील सिंदूर हाच तिच्या लूकचे मुख्य आकर्षण ठरले.

twitter
7/8

हात जोडून तिने पॅप्सना एकामागून एक पोझ दिल्या आणि पुन्हा एकदा सिद्ध केले की तिचा प्रत्येक अंदाज खास असतो.

twitter
8/8

twitter