ट्विंकलने लग्नासाठी अक्षयपुढे ठेवलेली 'ही' विचित्र अट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आज त्यांच्या लग्नाचा १९वा वाढदिवस साजरा करत आहेत. अक्षय आणि ट्विंकल यांना आरव आणि नितारा अशी दोन मुलं आहेत. दोघांनाही अनेकदा आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना पाहण्यात आलं आहे.  

Jan 17, 2020, 19:12 PM IST

ज्यावेळी अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं त्यावेळी ट्विंकलने एक अट ठेवली होती. अशी होती त्यांची लव्हस्टोरी...

1/6

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना १७ जानेवारी २००१ मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या मुलीला अक्षयने प्रपोज केलं होतं. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे झाले होते, मात्र मुलीच्या लग्नासाठी दोघेही एकत्र आले होते.

2/6

अक्षय-ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेयर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.

3/6

त्यानंतर या दोघांची पुन्हा एकदा 'इंटरनॅशनल खिलाडी'च्या शूटिंगदरम्यान भेट झाली. त्यानंतर मात्र दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते.

4/6

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये, अक्षयने त्यांच्या लग्नाबाबत एक किस्सा सांगितला होता. अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केलं त्यावेळी ट्विंकलचा 'मेला' चित्रपट प्रदर्शित होणार होता. ट्विंकल या चित्रपटासाठी अतिशय उत्साही होती. ट्विंकलने त्यावेळी अशी अट ठेवली की, जर 'मेला' हिट झाला तर ती अक्षयशी लग्न करणार नाही. आणि चित्रपट फ्लॉप झाला तर ती लग्न करणार...पण 'मेला' फ्लॉप झाला आणि दोघांचं लग्न झालं.

5/6

दोघांच्या लग्नाबाबत बोलताना, अक्षयने एका मुलाखतीत सांगितलं की, ज्यावेळी तो डिंपल कपाडिया यांच्याकडे ट्विंकलसोबत लग्नासाठी विचारणा करण्यासाठी गेला, त्यावेळी डिंपल कपाडिया अक्षयला समलैंगिक समजत होत्या. पण त्यानंतर अक्षयने डिंपल कपाडिया यांना ट्विंकलची योग्य ती काळजी घेण्याबाबत आश्वास्त केल्यानंतर, त्याचं लग्न पार पडलं.  

6/6

लग्नानंतर ट्विंकल खन्ना अभिनय क्षेत्रापासून दूरच राहिली. सध्या ट्विंकल लेखक आणि इंटिरियर डेकोरेटर म्हणून काम सांभाळते.