महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य अधिक खुलते. विशेष म्हणजे हे ठिकाण अतिशय बजेट फ्रेंडली आहे.
Matheran Hill Station Trip : महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. अशातच खरबदारी म्हणून पुणे, लोणावळा, नाशिकमधील सर्व पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे जायचं कुठं असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे. या पर्यटकांसाठी मुंबई आणि पुण्याजवळच्या जगप्रसिद्ध हिलस्टेशन बेस्ट ऑप्श्न ठरणार आहे. येथील डोंगरातून वाहणारे असंख्य धबधबे पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात.