अनन्या पांडेने बर्थडेच्या फोटोंमध्ये लपवला बॉयफ्रेंडचा चेहरा; असं झाले उघड

अनन्या पांडेचा वाढदिवस 30 ऑक्टोबरला होता. या दिवशी अनन्या पांडे 25 वर्षांची झाली. अनन्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. अनन्याने वाढदिवसाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री तिचा वाढदिवस एन्जॉय करताना दिसत आहे.

Nov 01, 2023, 17:56 PM IST
1/7

Ananya Panday Having Lunch At Maldives

अनन्या पांडे तिचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवमध्ये गेली होती. यादरम्यान अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत अनन्याने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यादरम्यान ती जेवणाच्या टेबलावर बसून फोटो क्लिक करताना दिसत आहे. 

2/7

Ananya Panday Enjoying her 25th Birthday

याशिवाय अभिनेत्रीने एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये अनन्या समुद्रकिनारी एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे आणि यादरम्यान काही लोक तिच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छेचे गाणे गाताना दिसत आहेत. ती यावेळी खूप आनंदी दिसत आहे. 

3/7

Ananya Panday cutting cake of her birthday

यानंतर तिने उशिरा रात्रीचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये अनन्या तिच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. यावेळी अनन्या तिच्या वाढदिवसाचा पूर्ण आनंद घेत आहे.

4/7

Ananya Panday at maldives

अनन्याने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचजवळ उभी राहून पोज देताना दिसत आहे. 

5/7

Ananya Pandey Instagram Post

ही फोटो शेअर करताना, अनन्याने कॅप्शनमध्ये, 25, खूप कृतज्ञता आणि धन्यवाद, प्रेम आणि चांगल्या भावनांसाठी धन्यवाद, मी माझ्या एक दिवस आधी तीन इंद्रधनुष्य पाहिले. वाढदिवस आणि मला हे एक मेसेज वाटला.

6/7

Ananya Pandey And Aditya Roy Kapur in Maldives

अनन्याला तिच्या वाढदिवसापूर्वी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. दुसरीकडे, त्याच दिवशी आदित्य देखील अनन्याशिवाय मुंबई विमानतळावर दिसला होता. त्यानुसार, हे लव्ह बर्ड्स अनन्याचा वाढदिवस मालदीवमध्ये एकत्र साजरा करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

7/7

Ananya Panday Film

दरम्यान, कामाबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या नुकतीच ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत आयुष्मान खुराना होता.