close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कारागृहातून अशा प्रकारे सुरु झाला जेटलींचा राजकीय प्रवास....

महागड़ी घड्याळं वापरण्याचा छंद जोपासणारे जेटली 

Aug 25, 2019, 16:17 PM IST

मुंबई :माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९ ऑगस्ट रोजी त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी दुपारी १२.०७ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीएसटी, नोटाबंदी अशा महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. गेल्या काही महिन्यापसून त्यांची प्रकृती गंभीर होती. 

1/7

कारागृहातून अशा प्रकारे सुरु झाला जेटलींचा राजकीय प्रवास....

कारागृहातून अशा प्रकारे सुरु झाला जेटलींचा राजकीय प्रवास....

आणीबाणीच्या काळात सरकारविरूद्ध मोर्चा काढल्यामुळे त्यांना बराच काळ तुरूंगात घालवावा लागला. याचदरम्यान त्यांना तिहार आणि अंबाला येथील तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्यांनी सेंट झेवियर्स स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. 

2/7

कारागृहातून अशा प्रकारे सुरु झाला जेटलींचा राजकीय प्रवास....

कारागृहातून अशा प्रकारे सुरु झाला जेटलींचा राजकीय प्रवास....

त्यानंतर श्रीराम माहाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. जेटलींच्या जवळाच्या मित्रांच्या माहितीनुसार शालेय जीवनात ते अत्यंत बुजऱ्या स्वभावाचे होते.  

3/7

अभिनेता देवानंदचे चाहते

अभिनेता देवानंदचे चाहते

जेटली बॉलिवूड अभिनेते देवानंदचे चाहते होते. 

4/7

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची वेळ

१९७७ साली दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अरूण जेटलींना लोकसभा निवडणुकीत उतरवू पाहात होते. पण त्यावेळेस त्यांचे वय एक वर्ष कमी असल्यामुळे त्यांना निवडणुकीत उभे राहता आले नाही. 

5/7

जेटलींचा विवाह सोहळा

जेटलींचा विवाह सोहळा

जेटलींच्या विवाह सोहळ्यात इंदिरा गांधी त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयीसुद्धा उपस्थित होते. कारण त्यांचे लग्न संगीता डोगरायांच्या सोबत झाले. त्या काँग्रेसचे दिग्गज नेते गिरधारी लाल डोगरा यांच्या कन्या आहेत.

6/7

जेटलींना महागड्या गोष्टी आवडत असत

जेटलींना महागड्या गोष्टी आवडत असत

जेटलींना महागड्या वस्तू, मुख्त्वे महागडी घड्याळं वापरण्याचा फार छंद होता. इतकच नव्हे, तर मित्रांसमवेत ते 'सेलर' डिस्कोमध्येही जात असत. 

7/7

जेव्हा घरातून पळाले होते जेटली

जेव्हा घरातून पळाले होते जेटली

महाविद्यालयीन दिवसात ते अखील भारतीय विद्यार्थी परिषदसोबत जोडले गेले होते. त्याचप्रमाणे राजकारणात सुद्धा सक्रीय झाले होते. याच वेळी जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली होती, तेव्हा त्यांनी सरकार विरूद्ध मोर्चा पुकारला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. जेव्हा २५ जून १९७५ रोजी पोलिसांनी रात्री त्यांच्या दरवाजा वाजवला तेव्हा वडील महाराज कृष्ण यांनी दरवाजा उघडला. घरी पोलीस आल्याचे कळताच रात्री दोन वाजता त्यांनी घराच्या मागच्या दारातून पळ काढला.