close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अरूण जेटलींचा साधेपणा पाहून तुम्ही देखील भारावून जाल

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

Aug 25, 2019, 17:44 PM IST

मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. ते ६६ वर्षांचे होते. भाजपमधील संयमी आणि बुद्धिमान नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सर्वपक्षीय संबंध असणारा नेता म्हणून जेटली यांची ओळख होती. दिल्लीतील उच्चभ्रू वर्तुळात जेटलींना विशेष मान होता. त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत आपल्या कुटुंबासोबतही वेळ व्यतीत करत असे. 

1/11

अरुण जेटली यांचे मुली सोनालीवर विशेष प्रेम होते

अरुण जेटली यांचे मुली सोनालीवर विशेष प्रेम होते

अरूण जेटली यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलाचे नाव रोहन जेटली तर मुलीचे नाव सोनाली जेटली असे आहे. मुलीवर त्यांचे विशेष प्रेम होते. 

2/11

प्रत्येक सण ते आपल्या कुटुंबासोबत साजरा करत असे.

प्रत्येक सण ते आपल्या कुटुंबासोबत साजरा करत असे.

आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत ते प्रत्येक सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करत असे. अगदी एखद्या सामान्य व्यक्ती प्रमाणे ते प्रत्येक सण साजरा करत असे. 

3/11

मित्रपरिवारासोबत अत्यंत साध्या पद्धतीत ते वाढदिवस साजरा करत.

मित्रपरिवारासोबत अत्यंत साध्या पद्धतीत ते वाढदिवस साजरा करत.

अरूण जेटली सामान्य व्यक्तिप्रमाणे स्वतःचा वाढदिवस साजरा करत असे. ते कोणत्याही प्रकारच्या बर्थडे पार्टीचं आयोजन करत नसे. मित्र आणि कुटुंबासोबत ते वाढदिवसचा आनंद साजरा करत असे. 

4/11

ऑफिसमधील अरूण जेटली

ऑफिसमधील अरूण जेटली

या फोटोमध्ये जेटली त्यांच्या लॅपटॅपवर काम करताना दिसत आहेत. 

5/11

होळीच्या रंगामध्ये अरूण जेटली

होळीच्या रंगामध्ये अरूण जेटली

होळीच्या रंगांची उधळण करताना अरूण जेटली. 

6/11

कुटुंबाला महत्व देणारे जेटली

कुटुंबाला महत्व देणारे जेटली

जेटलींच्या मते प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला वेळ देणे अत्यंत महत्वाचे आहे. काम सांभाळून ते नेहमी आपल्या कुटुंबाला वेळ देत असे. 

7/11

रक्षाबंधन जेटलींचा आवडतीचा सण

रक्षाबंधन जेटलींचा आवडतीचा सण

रक्षाबंधन हा सण आवडीचा असल्यामुळे ते लहान मुलांकडून देखील राखी बांधून घेत असत.

8/11

जेटलींचे रक्षाबंधनाचे फोटो

जेटलींचे रक्षाबंधनाचे फोटो

अरूण जेटली नेहमी त्यांचे रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. 

9/11

अरूण जेटली आणि त्यांच्या बहिणी

अरूण जेटली आणि त्यांच्या बहिणी

फोटोमध्ये त्यांच्या बहिणी त्यांना राखी बांधताना दिसत आहेत. 

10/11

कुटुंबासोबत लक्ष्मीपुजन करताना जेटली

कुटुंबासोबत लक्ष्मीपुजन करताना जेटली

दिवाळीमध्ये लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ते कुटुंबासोबत लक्ष्मीपुजन साजरा करत असे. 

11/11

जेटलींना आवडायची लहान मुलं

जेटलींना आवडायची लहान मुलं

जेटलींच्या मनात लहान मुलांप्रती अत्यंत प्रेम होते. त्यामुळे लहान मुलांना भेटण्यासाठी ते शाळेत जात असत.