1/5
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्या मिळालं होतं. 200 वर्षानंतर भारत स्वातंत्र्य झाला होता. इतके वर्ष इंग्रजांनी राज्य़ केल्यानंतर भारत सर्वात मोठी लोकशाही (Democratic Country) असलेला देश म्हणून पुढे आला. भारतीय इतिहासात हा दिवस सर्वात मोठा आहे. याच दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात.
2/5
3/5
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो (Congo) या देशाला 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रेंच शासकांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. हा देश मध्य आफ्रिकन प्रदेशात येतो. 1880 मध्ये फ्रेंच शासकांनी या देसाला गुलाम केले होते. प्रथम हा देश फ्रेंच कांगो म्हणून ओळखला जात होता, नंतर 1903 मध्ये मध्य कांगो म्हणून ओळखला जात होता. स्वातंत्र्यानंतर 'फुलबर्ट यूलू' (Fulbert Youlou) देशाचे पहिले राष्ट्रपती झाले आणि त्यांनी 1963 पर्यंत राज्य केले.
4/5
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया दोघेही 15 ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात. दरवर्षी 15 ऑगस्टला दोन्ही देशांमध्ये सुट्टी असते आणि हा दिवस 'जपानपासून स्वातंत्र्य' म्हणून साजरा केला जातो. 1945 मध्ये, अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने मिळून कोरियावरील 35 वर्षांचा जपानी व्याप संपवला आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. 1945 मध्ये या दिवशी दुसरे महायुद्ध संपले. यानंतर, 1948 मध्ये, कोरिया सोव्हिएत समर्थित उत्तर आणि अमेरिका समर्थित दक्षिण यांच्यात विभागला गेला. दक्षिण कोरिया अधिकृतपणे कोरिया प्रजासत्ताक म्हणून ओळखला जातो.
5/5