Ashadhi Ekadashi Wishes :चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी...आषाढी एकादशीनिमित्त आपल्या प्रियजनांसह विठ्ठल भक्तांना द्या विठुमय शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes in Marathi : 6 जुलैला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीचा उत्साह असणार आहे. पंढरपुरात भक्तांचा मेळा भरलाय. एकादशी ही भगवान विष्णुला समर्पित आहे. देशभरात एकादशीला विष्णूची पूजा करण्यात येणार आहे. अशा या आषाढी एकादशीच्या तुमच्या प्रियजनांना आणि विठ्ठल भक्तांना द्या खास मराठीतून शुभेच्छा.   

नेहा चौधरी | Jul 05, 2025, 09:05 PM IST
twitter
1/10

आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातील सर्व दु:ख, चिंता दूर होवोत  तुमचं आयुष्य भक्ती, प्रेम आणि समाधानाने भरून जावो! जय विठ्ठल विठ्ठल! पंढरीनाथ महाराज की जय! देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

twitter
2/10

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..! आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!  

twitter
3/10

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.. देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

twitter
4/10

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हरे चिंता, व्यथा क्षणाधारत… सोड अहंकार सोड तू संसार क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून .... आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा    

twitter
5/10

तुला साद आली, तुझ्या लेकरांची  अलंकापुरी आज भारावली  आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा   

twitter
6/10

 विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!  

twitter
7/10

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!  

twitter
8/10

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा  

twitter
9/10

सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा  

twitter
10/10

 तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा  

twitter