अवघ्या महाराष्ट्र विठुरायाच्या भक्तीत नाहून निघणार आहे. आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्त मंदिर आणि परिसरात सुंदर अशी पुष्प सजावट करण्यात आली आहे.
1/8संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे आषाढी पायी वारीसाठी आळंदी नगरी फुलांनी सजली आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
2/8आळंदीतून संध्याकाळ 4 वाजता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. रात्री आळंदीतच आजोळघरी गांधीवाडा दर्शनबारी मंडपात ती मुक्कामी राहणार आहे.
3/8आळंदीतून सुमारे 17 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.
4/8यंदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
5/8इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडली आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांनी आळंदीला जाण्याऐवजी पुण्यामध्ये जावं असं आवाहन केलंय.
6/8मानाच्या ५६ दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ दहा वारकऱ्यांचा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.
7/8परंपरेनुसार दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एक हजार ६६० व्यक्तींच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे.
8/8धुंवाधार बरसत असलेल्या पावसामुळं यावेळी आंदळीनगरीत भजन,कीर्तन आणि विठू नामाच्या गजरानं नाहून निघणार नाही.