Astrology 2026 : गुरू गोचरमुळे 31 ऑक्टोबरपर्यंत कोणत्या मूलांकाला लाभ आणि कोणाला राहावं लागेल सावध?

Written ByNeha Choudhary
Published: Jun 03, 2026, 02:28 PM IST|Updated: Jun 03, 2026, 02:28 PM IST

Guru Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह हा ज्ञान, भाग्य, संपत्ती, संतती आणि प्रगतीचा स्वामी मानला गेला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला गुरु ग्रहाचे महागोचर झाले आहे. त्यामुळे या ग्रह गोचरचा प्रत्येक मूलांकावर वेगवेगळा परिणाम पाहिला मिळतो. अशात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुमच्या करिअर, संपत्ती, प्रेम आणि भाग्यावर गुरु गोचरचा काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊयात अकंशास्त्र तज्ज्ञ कविता ओझा यांच्याकडून... 

Numerology1/9

मूलांक 1 (1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक)

तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळणार आहे. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळणार आहे. नवीन जबाबदाऱ्या भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. 

Numerology2/9

मूलांक 2 (2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहे. मानसिक ताण कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळणार आहे. वैवाहिक बाबींमध्ये प्रगती होणार आहे. 

Numerology3/9

मूलांक 3 (3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)

तुमचं गुरु गोचरमुळे भाग्य उजळणार आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि गुंतवणूक या बाबींमध्ये लाभ मिळणार आहे. आदर आणि प्रतिष्ठेत वाढणार आहे. 

Numerology4/9

मूलांक 4 (4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

तुम्हाला आर्थिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे. अनावश्यक खर्च वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या काही योजनांमधून अपेक्षित परिणाम मिळणार नाही. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे महागात पडेल. 

Numerology5/9

मूलांक 5 (5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)

व्यवसाय, संवाद, लेखन, माध्यम आणि विपणन या क्षेत्रांत गुंतलेल्यांना फायदा होणार आहे. नवीन संधी निर्माण होणार आहे. परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित कामात यश मिळणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. 

Numerology6/9

मूलांक 6 (6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)

प्रेम आणि वैवाहिक जीवन अधिक सुसंवादी असणार आहे. मालमत्ता आणि वाहनांसंबंधी बाबींमध्ये लाभ होणार आहे. सृजनशील कार्यांमध्ये यश मिळणार आहे. कौटुंबिक पाठिंबा मिळणार आहे.

Numerology7/9

मूलांक 7 (7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)

आध्यात्मिक आणि मानसिक विकासाच्या संधी मिळणार आहे. मात्र काही बाबतीत अपेक्षित परिणाम मिळण्यास विलंब होणार आहे. संयम राखल्यास यश मिळेल. प्रवास आणि शिक्षण फायदेशीर ठरणार आहे. 

Numerology8/9

मूलांक 8 (8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)

तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. पण परिणाम अपेक्षेपेक्षा उशिरा मिळणार आहे. कायदेशीर किंवा कागदपत्रांच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास नुकसान होईल. अनावश्यक वाद टाळणेच उत्तम राहणार आहे. 

Numerology9/9

मूलांक 9 (9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)

तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढणार आहे. करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. व्यवसायाचा विस्तार आणि नवीन प्रकल्प यशस्वी होणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)