'मायबाप'.... विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट; घ्या घरबसल्या दर्शन

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची आरास केली गेली आहे. 

Jul 01, 2021, 07:48 AM IST

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची आरास केली गेली आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आज आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुस-यावर्षी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा संपन्न होत आहे. यावर्षीचा हा ३३६ वा पालखी सोहळा आहे. दुपारी २ वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरूवात होईल. आज पहाटे ४.३० वाजता मंदिरात विविध कार्यक्रमांची सुरूवात झाली. पहाटे साडेचारवाजता शिळा मंदिरात अभिषेक झाला. त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि काकड आरती करून सुरूवात करण्यात आली.... पाहा फोटो

1/5

प्रस्थान सोहळ्यासाठी १०० वारक-यांना परवानगी देण्यात आलीय. खरंतर या दिवशी देहू नगरी लाखो वारक-यांनी गजबजलेली असलते. मात्र कोरोनामुळे पालखी सोहळ्यावर अनेक निर्बंध घालण्यात आलेत. देहू आणि परिसरात संचारबंदी आहे.  

2/5

ग्यानबा तुकारामचा नामघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे.  

3/5

जगदगुरु तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी आज प्रस्थान ठेवणार, सोहळ्याला 100 वारक-यांना उपस्थित राहण्यास परवानगी  

4/5

पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होतंय. मात्र यंदाही पायी वारी रद्द झाल्याने यावेळी गावातील मंदिरातून पादुका, पालखी निघणार आणि गोदावरी काठी समाधी मंदिरात दशमी पर्यंत ठेवण्यात येणार आहे.   

5/5

 यावेळी फक्त 50 लोकांना पालखी सोबत चालण्याची परवानगी देण्यात आली आहे.