Auto News : सामान्य कुटुंबासाठी खास, जादूचा खण असणारी ऑटोमॅटिक SUV! 5 स्टार सेफ्टीची हमी

Auto News : एक उत्तम आणि तितकीच चांगली कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर 5 स्टार सेफ्टी रेटींग असणारी ही कार खरेदी करण्याचा विचार केलाच जाऊ शकतो. ही कार इतकी खास का आहे? पाहा किंमत आणि बरंच काही...   

Sayali Patil | Mar 03, 2026, 06:36 PM IST
twitter
1/8

Auto क्षेत्र

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

Auto News : चांगली रेटींग, चांगलं इंजिन आणि उत्तम परफॉर्मन्स असणारी कार हवी, असंच अनेक मंडळी जेव्हा कार पहिली कार खरेदी करतात तेव्हा आग्रहानं सांगतात. मुळात हे कार खरेदीचे महत्वाचे निकष असतात. अशाच मध्यमवर्गीय कुटुंबासाठी साधारण 8 ते 10 लाखांचं बजेट असणाऱ्यांसाठी एक कमाल Auto क्षेत्रात विक्रीकरता उपलब्ध आहे.   

twitter
2/8

वाहतूक कोंडी

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये ही कार एक चांगला पर्याय असून, ऑटोमॅटिक एसयुव्ही श्रेणीत ती गणली जात असल्यानं अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. ही कार म्हणजे निसानची मॅग्नाईट व्हिसिया एएमटी (Nissan Magnite Visia AMT). 

twitter
3/8

क्रॅश टेस्ट

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटींग मिळालेली ही कार तिच्या फिचरमुळं अनेकांच्याच यादीत आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत आहे 6.21 लाख. ही देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक एसयुव्ही असून, तिची थेट स्पर्धा Tata Punch, Tata Nexon आणि Hyundai Exter शी आहे. 

twitter
4/8

इंजिन

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

999cc चं 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असणारी ही कार टर्बो आणि नॉन-टर्बो अशा दोन पर्यायांत उपलब्ध असून, ट्रान्समिशनसाठी त्यात 5 स्पीड मॅन्युअल, 5 स्पीड एएमटी आणि सीवीटी ऑटोमॅटिक असे पर्याय मिळतात. शहरी रस्त्यांसह ही कार महामार्गांवरही वाहन चालनाचा उत्तम अनुभव देते.   

twitter
5/8

पेट्रोल वर्जन

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

ARAI च्या माहितीनुसार Nissan Magnite चं पेट्रोल वर्जन  17.9 ते 19.9 किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देतं. तर, काही अहवालांनुसार ही कार सरासरी 19 ते 20 किमी प्रतिलीटर इतकंही मायलेज देते.   

twitter
6/8

समाधानकारक मायलेज

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

समाधानकारक मायलेज आणि किमान खर्च या कारच्या जमेच्या बाजू असल्यामुळं अनेकजण ती खरेदी करण्याचा विचार करत आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत या कारमध्ये कंपनीनं अधिक भर दिल्याचं पाहायला मिळतं. 

twitter
7/8

6 एअरबॅग

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

6 एअरबॅग असणाऱ्या या कारच्या व्हेरिएंटला ग्लोबल NCAPकडून 5 स्टार रेटिंग मिळालं असून, त्यात ABS आणि EBD, व्हीकल डायनामिक कंट्रोल आणि रियर पार्किंग सेंसर्स असेही फिचर मिळतात. कंपनीनं अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या कारच्या इंटेरिअरमध्ये एक असाही कप्पा येतो जिथं थंड पाण्याची बाटली बराच वेळ थंड ठेवता येते, ज्यामुळं हा कारमध्ये असणारा जादूचा कप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही.   

twitter
8/8

8 इंचांचं टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिसिटीम

Auto news budget suv 5 Star Safety Nissan Magnite Visia AMT price features

8 इंचांचं टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिसिटीम, वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 360 डिग्री कॅमेरा, क्रूज कंट्रोल आणि 336 लीटरचा बूट स्पेस या कारमध्ये मिळतो. गरज भासल्यास हाच बूटस्पेस 690 लीटरपर्यंतच वाढवताही येतो.   

twitter