22 लाख 23 हजार दिवे, 84 लाख फटाके अन्... अयोध्येत वर्ल्ड रेकॉर्डची दिवाळी!
Ayodhya Deepotsav 2023 : अयोध्येची दिवाळी आता जगप्रसिद्ध झाली आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येत खास सजावट करण्यात आली आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला शरयू नदीच्या तिरावर लाखो दिव्यांनी रोषणाई करण्यात आली होती. यावेळी संपूर्ण अयोध्याही नववधूप्रमाणे सजली आहे.
1/7
त्रेतायुग सारखी दिवाळी परत
अयोध्येत शनिवारी श्रद्धेच्या उत्सवात लाखो लोकांनी महादीपोत्सव पाहिला. इथे आलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्रेतायुगासारखी दिवाळी इथे परत आली आहे. दीपोत्सवानिमित्त राम की पेडी येथे भव्य लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. भगवान श्रीरामाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील लाखो लोक श्री राम जन्मभूमीवर जमले होते.
2/7
प्रभू श्रीरामाचे स्वागत
3/7
अयोध्येत विश्वविक्रम
रामनगरीत 22 लाख 23 हजार दिवे प्रज्वलित होताच अनोखा इतिहास रचला गेला. दिवे लावण्याच्या या विक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. राममय अयोध्येने पुन्हा एकदा लाखो दिवे लावून नवा विश्वविक्रम केला आहे. स्वत:चाच पूर्वीचा विक्रम मोडत अयोध्या शहराने एकाच वेळी २२ लाख २३ हजार दिवे लावण्याचा नवा आणि आश्चर्यकारक विक्रम केला आहे.
4/7
ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे दिव्यांची मोजणी
हा विक्रम केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नवा विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिले आहे. विविध घाटांवर एकाच वेळी हे दिवे लावण्यात आले आहेत. 25 हजार स्वयंसेवकांनी 51 घाटांवर लाखो दिवे प्रज्वलित करून संपूर्ण अयोध्या उजळून टाकली. तसेच यावेळी 84 लाख पर्यावरणपूरक फटाके देखील फोडण्यात आले.
5/7
प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक
6/7