close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी अभिनेत्याची साडी नेसून एन्ट्री

Aug 13, 2019, 20:57 PM IST
1/5

राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा अभिनेता आयुषमान खुराना आगामी 'ड्रीमगर्ल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

2/5

चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी आयुषमानने निळ्या रंगाची सिल्कची साडी नेसून हजेरी लावली. 'ड्रीमगर्ल' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अफलातून मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळत आहे. 

3/5

'ड्रीमगर्ल' चित्रपटातून आयुषमान खुराना, नुसरत भरुचा, अन्नू कपूर भूमिका साकारणार आहे.

4/5

ट्रेलरमध्ये आयुषमान राधा आणि सीतेच्या रुपात पाहायला मिळतोय. कुठे तो पूजा नावाच्या मुलीच्या आवाजात अनेकांशीच संवाद साधताना दिसतोय. यातूनच पुढे एक मजेशीर कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

5/5

एकता कपूरच्या निर्मितीमध्ये साकारणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांदिल्या यांनी केलंय. १३ सप्टेंबरला 'ड्रीमगर्ल' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.