'नॅनो' कार पेक्षा छोटी बजाजची 'क्यूट' कार लॉन्च

Apr 18, 2019, 20:27 PM IST
1/5

एक्स-शोरूममध्ये 2.48 लाख

 एक्स-शोरूममध्ये 2.48 लाख

पेट्रोल प्रकारातील कार एक्स-शोरूममध्ये 2.48 लाख आणि सीएनजी प्रकारातील ही कार एक्स-शोरूममध्ये 2.78 लाख रुपये किमतीत उपलब्ध आहे. सीएनजी प्रकारातील कार 30 हजार रुपयांनी महाग आहे. बजाजने क्यूट कारला गुजरात, केरळ, राजस्थान, यूपी आणि उड़ीसा या राज्यात आधीच लॉन्च केले आहे. आता कंपनी महाराष्ट्रता लॉन्च करत आहे. दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात 15 हजार रुपयांनी ही कार स्वस्त आहे. 

2/5

216 सीसीचे सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजन

216 सीसीचे सिंगल सिलिंडर लिक्विड कूल्ड इंजन

क्यूट ही देशातील अशी कार आहे की, तिला परिवहन मंत्रालयाने बाजारात उतरण्यासाठी मंजुरी दिली आहे. क्वाड्रीसाइकिल प्रकारातील ही कार आहे. अशा कारला एक्स्प्रेस वे वर धावण्याची अनुमती नसते. मात्र, ही रस्त्यावर धावणारी पहिली कार आहे. २०१८ मध्ये रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने 'क्वाड्रीसायकल' गाडीला देशात परवानगी दिली. या गाडीला कायदेशीर मान्यता मिळाल्याने ही कार आता रस्त्यावर धावणार आहे. ही कार व्यावसायिक आणि वैयक्तिक उपयोगासाठी वापरण्यात येऊ शकते. या कारला पाच स्पीड  सीक्यूएंटल मॅन्युअल गिरयबॉक्स लेस आहे.  

3/5

1,925 एमएमचे व्हीलबेस

1,925 एमएमचे व्हीलबेस

या क्यूट कारची लांबी २७५२ मिमी आणि रुंदी १३१२ मिमी आहे. तर उंची १६५२ मिमी आहे. कारचा वीलबेस १९२५ मिमी आहे. 'क्यूट'चे टर्निंग रेडियस ३.५ मीटर आहे. ही देशातील सर्वात लहान कार आहे. पेट्रोल इंजनची  क्यूट कारचे वजन 452 किलो आहे. तर सीएनजीमधील कार 504 किलोची आहे.

4/5

पेट्रोल इंजिन ताशी 35 किमी मायलेज देईल

पेट्रोल इंजिन ताशी 35 किमी मायलेज देईल

बजाज कंपनीने दावा केला आहे की, पेट्रोल इंजिनची कार ताशी 35 किमी मायलेज देईल. तर सीएनजीमधील कार 43 किमी मायलेज देईल. ही कार सहा रंगात बाजारात दाखल होणार आहे.  

5/5

पाच वर्षांनंतर मिळाली मंजुरी

पाच वर्षांनंतर मिळाली मंजुरी

'बजाज क्यूट' कारला २०१२ मध्ये 'ऑटो एक्सपो'मध्ये सादर करण्यात आले होते. त्यावेळी re60 या सांकेतिक नावाने फर्स्ट लूक दाखवण्यात आला. त्यानंतर २०१६ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये बाजारात ही कार लॉन्च करण्यात येणार असल्याचे सादर करण्यात आली. या कारच्या मंजुरीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. आता ही कार रस्त्यावर धावताना दिसणार आहे. याची किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे.