1/5
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण यापैकी काही कलाकार असेही आहेत जे ट्रेंड सेटर ठरले आहेत. अशाच ट्रेंड सेटरपैकी एक नाव म्हणजे बप्पी लहिरी...बप्पी लहिरी यांनी बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला पार केला आहे. बप्पी लहिरी यांचं नाव नेहमी दोन गोष्टींशी जोडण्यात आलं आहे. एक गाण्यातील वेगळेपण आणि दुसरं सोनं... बप्पी दांचं सोन्याप्रति असलेलं प्रेम सर्वांनाच माहितेय. पण बप्पी लहिरी इतकं सोनं का घालतात? (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
2/5
आज २७ नोव्हेंबर रोजी बप्पी दा त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. १९७३ मध्ये त्यांनी 'नन्हा शिकारी' या चित्रपटातून करियरची सुरुवात केली. १९७६ मध्ये आलेल्या विशाल-आनंद यांच्या 'चलते-चलते' चित्रपटातून बप्पी दा यांना ओळख मिळाली. चित्रपट बॉक्सऑफिसवर तितकासा कमाई करु शकला नाही, पण चित्रपटातील गाणी मात्र गाजली.
3/5
त्यानंतर १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवती यांच्या 'डिस्को डान्सर' चित्रपटातील गाण्यांनी बप्पी दा यशशिखरावर पोहचले. त्यानंतर आलेल्या 'नमक हलाल', 'शराबी', 'हिम्मतवाला', 'साहेब', 'गुरु', 'घायल', 'रंगबाज', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'द डर्टी पिक्चर' यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
4/5
बप्पी लहिरी गोल्डसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. एका मुलाखतीत त्यांना इतकं सोनं का घालतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना बप्पी लहरी यांनी सांगितलं की, 'हॉलिवूडमध्ये एलविस प्रेस्ली सोन्याची चैन घालत असत. एलविस माझे अतिशय आवडते होते. मी नेहमी विचार करत होतो, जर मी जीवनात मोठं यश संपादन केलं, तर मी माझी एक वेगळी ओळख स्थापित करेन. देवाची कृपा आहे की मी इतकं सोनं घालू शकलो. सोनं माझ्यासाठी लकी असल्याचं' बप्पी दांनी सांगितलं होतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
5/5