close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ऐतिहासित मालिकेतून बरखा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत ती 'तारिणी'च्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे.

Jun 19, 2019, 12:06 PM IST

मुंबई : अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ताने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. आता बरखा पहिल्यांदा ऐतिहासीक कथेवर आधारलेल्या मालिकेत अभिनय करण्याकरता सज्ज झाली आहे. 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत ती 'तारिणी'च्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. तेव्हा आता प्रेक्षक 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटानंतर बरखाच्या 'तारिणी'च्या भूमिकेला किती प्रतिसाद देतात याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल.  

1/5

बरखा बिष्ट सेनगुप्ता

बरखा बिष्ट सेनगुप्ता

'चंद्रगुप्त' मालिकेत धनानंद (सौरभ राज जैन)च्या हरवलेल्या प्रेयसीच्या भूमिकेत ती चाहत्यांच्या समोर येणार आहे.

2/5

चंद्रगुप्त मौर्य

चंद्रगुप्त मौर्य

बरखा म्हणाली की, 'मी 'चंद्रगुप्त' मालिकेत भूमिका साकारण्यासाठी फार उत्सुक आहे. माझी ही पहिली ऐतिहासीक मालिका आहे. मालिका निर्माते सिद्धार्थ कुमार यांना फार दिवसांपासुन ओळखत आहे.'

3/5

बरखा म्हणाली...

बरखा म्हणाली...

यापुढे ती म्हणाली, 'सिद्धार्थचा ऐतिहासीक आणि पौराणिक कथांमध्ये खूप दांडगा अनुभव आहे. मला त्याच्या सोबत काम करायला नक्कीच आवडेल.' 

4/5

झळकणार 'तारिणी'च्या भूमिकेत

झळकणार 'तारिणी'च्या भूमिकेत

'जेव्हा मला तारिणीची भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली तेव्हा मला फार आनंद झाला होता. त्या भूमिकेने माला फारच आकर्षित केले आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता मी ही भूमिका साकारण्यास होकार दिला.'  

5/5

यशोदा बेन

यशोदा बेन

बरखा 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी यशोदाबेन यांच्या भूमिकेत झळकली होती. चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत झळकला होता.