BCCI ची अधिकृत घोषणा! "साईराज बहुतुले" सांभाळणार भारतीय फिरकी गोलंदाजांची जबाबदारी

Written ByShubhangi Mere
Published: Jun 02, 2026, 08:50 PM IST|Updated: Jun 02, 2026, 08:50 PM IST

भारतीय संघाची आता अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ही मालिका भारतामध्येच होणार आहे, यासाठी आता भारतीय क्रिकेट संघाला नवीन प्रशिक्षक मिळाले आहे यासंदर्भात जाणून घ्या. 

Sairaj Bahutule1/8

6 जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी साईराज बहुतुले यांची भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

India spin coach2/8

अलीकडेच राजस्थान रॉयल्ससोबत होते आणि आता ते भारतीय संघासोबत काम पाहतील. बहुतुले यांची टीम इंडियाचे फिरकी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Indian cricket team coach3/8

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी ही घोषणा केली. 53 वर्षीय बहुतुले यांनी आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

 

Sairaj Bahutule appointed spin coach India4/8

महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यासोबत खेळले आहे. महाराष्ट्रात जन्मलेल्या साईराज यांनी एकूण 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Sairaj Bahutule coaching career5/8

बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे, "बीसीसीआय साईराज बहुतुले यांची टीम इंडियाचे नवीन फिरकी प्रशिक्षक म्हणून घोषणा करत आहे." फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Spin Bowling Coach Sairaj Bahutule6/8

साईराज यांना देशांतर्गत क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 188 प्रथम-श्रेणी सामने आणि 143 लिस्ट ए सामने खेळले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

India Spin Bowling Coach7/8

साईराज बहुतुले खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमधील दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्यांनी आपली एक भक्कम प्रतिष्ठा निर्माण केली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया

BCCI Sairaj Bahutule8/8

देशांतर्गत क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडू असलेल्या साईराज यांनी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये 6176 धावा केल्या आणि 630 बळी घेतले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया