सुकलेली लिंब फेकून देताय तर थांबा, किचनमध्ये असा करा वापर

लिंब फ्रीजमध्ये ठेवून सुकून गेली की गृहिणी ते हमखास फेकून देतात. मात्र, लिंबाचा वापर तुम्ही किचनमध्ये करु शकता.

| Jun 12, 2023, 19:56 PM IST

Benefits of Dried Lemon: लिंब फ्रीजमध्ये ठेवून सुकून गेली की गृहिणी ते हमखास फेकून देतात. मात्र, लिंबाचा वापर तुम्ही किचनमध्ये करु शकता.

1/5

सुकलेली लिंब फेकून देताय तर थांबा, किचनमध्ये असा करा वापर

benefits of dry lemon in kitchen

गरमीच्या दिवसात लिंबू लवकर सुकून जातात. अशावेळी त्यातील रस काढणे कठिण होऊन बसते. नाईलाजाने मग सुकलेले लिंबू फेकून द्यावे लागतात. मात्र, सुकलेले लिंबूदेखील तुमच्यासाठी कामाचे ठरु शकतात. कसं ते जाणून घेऊया

2/5

चॉपिंग बोर्ड

benefits of dry lemon in kitchen

चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी तुम्ही सुकलेले लिंबू वापरु शकता. लिंबू कापून त्यावर मीठ टाकून चॉपिंग बोर्डवर घासून तो स्वच्छ करा  

3/5

हे नक्की ट्राय करा

benefits of dry lemon in kitchen

सुकलेले लिंबू कापून उकळत्या मीठाच्या पाण्यात टाकून एक चांगली उकळी घ्या. हे पाणी तुम्ही किचन टाइल्स आणि सिंकची स्वच्छता करण्यास वापरु शकता. त्याव्यतिरिक्त भांडी घासण्यासाठीही तुम्ही हे पाणी वापरु शकता. तसंच, डस्टबिन साफ करण्यासाठीही लिंबाचे हे पाणी वापरु शकता. 

4/5

मिक्सर

benefits of dry lemon in kitchen

मिक्सरच्या भांड्यात सुकलेले लिंबू टाकून त्याची पेस्ट करुन घ्या. यामुळं मिक्सचे भांडे आणि ब्लेंडरला धारदेखील स्वच्छता होईल. 

5/5

नखांसाठी वापर

benefits of dry lemon in kitchen

सुकलेल्या लिंबाचा वापर तुम्ही नखं स्वच्छ करण्यासाठीही वापरु शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक येते