SBI, PNB, ICICI की HDFC? कोणती बँक FD वर देते जास्त व्याज; श्रीमंतीचं सिक्रेट तुम्हाला माहिती असायला हवं!

FD Intrest Rate: एफडी ही गुंतवणूक आजही सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळण्यासाठी बेस्ट मानली जाते. 2026 मध्ये बँकांच्या एफडी व्याजदरांमध्ये बराच फरक दिसतोय.

Pravin Dabholkar | Apr 08, 2026, 03:39 PM IST
twitter
1/9

SBI, PNB, ICICI की HDFC बँक? कुठे एफडी ठेवणं तुमच्या फायद्याचं? श्रीमंतीचं सिक्रेट!

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

FD Intrest Rate: जगातील अस्थिर वातावरणामुळे सध्या शेअर मार्केट खूपच वरखाली होताना दिसतंय. अशावेळी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी ही गुंतवणूक आजही सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळण्यासाठी बेस्ट मानली जाते. 2026 मध्ये बँकांच्या एफडी व्याजदरांमध्ये बराच फरक दिसतोय.

twitter
2/9

दीर्घकाळात मोठा फायदा किंवा तोटा

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

छोट्या वाटणाऱ्या दराचा फरकही दीर्घकाळात मोठा फायदा किंवा तोटा करू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना बँकांची चांगल्या प्रकारे तुलना करूनच निर्णय घ्यावा लागतो. एसबीआय, एचडीएफसी, पीएनबी, अॅक्सिस, आयसीआयसीआय आणि येस बँक यांच्यापैकी कुठे एफडी केल्यास तुमचा सर्वाधिक फायदा आहे? सविस्तर जाणून घेऊया.

twitter
3/9

स्टेट बँक ऑफ इंडिया

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून एसबीआय सामान्य ग्राहकांना ३.०५ टक्क्यांपासून ६.४० टक्क्यांपर्यंत व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना मात्र ७.०५ टक्क्यांपर्यंत चांगला परतावा मिळू शकतो. उदाहरणार्थ, एक वर्षाच्या गुंतवणुकीवर साधारण लोकांना ६.२५ टक्के तर सीनियर सिटीझन्सना ६.७५ टक्के व्याज मिळते. सरकारी बँक असल्याने पैशाची पूर्ण सुरक्षा आहे आणि स्थिरता हवी असणाऱ्यांसाठी हा पर्याय अगदी योग्य आहे. लांब मुदतीत गुंतवणूक करणारे लोक याचा फायदा घेऊ शकतात.

twitter
4/9

एचडीएफसी बँक

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

ही खासगी बँक एफडी योजनांसाठी लवचिक पर्याय देते. सामान्य गुंतवणूकदारांना २.७५ टक्क्यांपासून ६.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळते, तर वयस्करांना ७ टक्के पर्यंत रिटर्न मिळू शकतो. सात दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत कोणतीही मुदत निवडता येते. बँकेच्या उत्तम डिजिटल सेवेमुळे गुंतवणूक करणे आणि ती तपासणे सोपे जाते. ज्यांना वेगवेगळ्या कालावधीत पैसे ठेवायचे आहेत त्यांना हे खूप सोयीस्कर वाटते आणि परतावाही समाधानकारक मिळतो.

twitter
5/9

पंजाब नॅशनल बँक

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

सरकारी क्षेत्रातील ही बँक सामान्य लोकांना ३ टक्क्यांपासून ६.६० टक्क्यांपर्यंत व्याज देते. सीनियर सिटीझन्सना ७.१० टक्क्यांपर्यंत फायदा होतो. याशिवाय कर बचत करणाऱ्या एफडी योजनेत ५.८५ ते ६.२५ टक्के दर आहे आणि वयस्करांसाठी तो आणखी थोडा जास्त असू शकतो. कर कमी करायचा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय फायद्याचा ठरतो. बँकेची विश्वासार्हता जास्त असल्याने जोखीम न घेता चांगला परतावा मिळवता येतो.

twitter
6/9

अॅक्सिस बँक

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

या बँकेत सामान्य ग्राहकांना ३ टक्क्यांपासून ६.४५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते, तर सीनियर सिटीझन्सना ७.२० टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो. मध्यम पातळीवर चांगला दर देणारी ही बँक डिजिटल सुविधांमुळे प्रसिद्ध आहे. ऑनलाइन गुंतवणूक आणि व्यवस्थापन करणे सोपे जाते. जे लोक आधुनिक तंत्रज्ञान वापरून गुंतवणूक करतात त्यांना हे पर्याय आवडते आणि त्यात स्थिरता व परतावा दोन्ही मिळतात.

twitter
7/9

आयसीआयसीआय बँक

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

खासगी बँकांमध्ये आघाडीवर असलेली आयसीआयसीआय सामान्य लोकांना २.७५ टक्क्यांपासून ६.५० टक्क्यांपर्यंत व्याज देते. वयस्करांना ७.१० टक्के पर्यंत रिटर्न मिळतो. मुदत सात दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत उपलब्ध आहे. विश्वास आणि लवचिक योजनांसाठी ही बँक ओळखली जाते. गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार मुदत आणि रक्कम निवडू शकतात. यामुळे छोट्या-मोठ्या गुंतवणुकीसाठी हे एक विश्वसनीय पर्याय ठरते.

twitter
8/9

येस बँक

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

सर्व बँकांमध्ये सर्वाधिक दर देणारी येस बँक सामान्य ग्राहकांना ३.२५ टक्क्यांपासून ७ टक्क्यांपर्यंत व्याज देते, तर सीनियर सिटीझन्सना ७.७५ टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो. जास्त कमाई हवी असणाऱ्यांसाठी हा आकर्षक पर्याय आहे. 

twitter
9/9

काय घ्याल काळजी?

indias best bank for fixed deposit rates know highest fd interest rates

गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा. छोट्या बँका जास्त दर देतात पण मोठ्या बँका जास्त सुरक्षित असतात. मुदत, कर परिणाम, पैसा काढण्याची सोय आणि एकूण परतावा याची तुलना करूनच निर्णय घ्या, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला नफा मिळेल.

twitter