....असं केल्यास तुमचं WhatsApp होईल कायमचं बंद

Nov 18, 2018, 18:57 PM IST
1/5

....असं केल्यास तुमचं WhatsApp होईल कायमचं बंद

तंत्रज्ञानाची दिवसागणिक होणारी प्रगती पाहता या साऱ्यामध्ये व्हॉट्स अॅपच्याही वाढत्या वापराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विविध कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्स अॅपकडे नुसतं चॅटींग अॅप म्हणून जर तुम्ही पाहात असाल तर मात्र हा दृष्टीकोन तुम्ही बदलला पाहिजे. कारण, व्हॉट्स अॅपवर खालील चुकींना माफी नाही.... व्हॉट्स अॅप वापरतेवेळी जर का या ठराविक गोष्टींची काळजी घेतली नाही, तर मात्र तुम्हाला त्याचा वापर करता येणार नाही हेसुद्धा तितकच खरं. व्हॉट्स अॅपकडून नमूद करण्यात आलेल्या नियम व अटींनुसार कोणत्याही आक्षेपार्ह, अश्लील, अपमानास्पद, द्वेष, हिंसा पसरवणाऱ्या गोष्टी पोस्ट अथवा फॉरवर्ड केल्यास व्हॉट्स अॅप हे तुम्ही कधीच वापरु शकणार नाही. (छाया सौजन्य- Pixabay) 

2/5

....असं केल्यास तुमचं WhatsApp होईल कायमचं बंद

फेसबुक आणि इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्स अॅपवरही फेक अकाऊंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तेच पाहता जर असं कोणतंही अकाऊंट आढळलं  तर त्यावर कायमची बंदी घालण्यात येणार आहे. (छाया सौजन्य- Pixabay)   

3/5

....असं केल्यास तुमचं WhatsApp होईल कायमचं बंद

चुकीचे, बेकायदेशी आणि खोटे मेसेज मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करणाऱ्यांवरही व्हॉट्स अॅपची नजर आहे. तसं करणारं कोणतंही अकाऊंट आढळल्यास त्यावर या अॅप वापरण्याची बंदी घालण्यात येणार आहे. (छाया सौजन्य- Pixabay) 

4/5

....असं केल्यास तुमचं WhatsApp होईल कायमचं बंद

कोडिंगचा तसा फारसा कोणाचा संबंध येत नाही. पण, व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांपैकी कोणी त्यातील कोडींगमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. (छाया सौजन्य- Pixabay)   

5/5

....असं केल्यास तुमचं WhatsApp होईल कायमचं बंद

एकाच वेळी अनेक अकाऊंट व्हॉट्स अॅपवरुन ब्लॉक करणंही तुमच्या अंगाशी येऊ शकतं. त्याशिवाय कोणी तुमच्याविषयी एखादा रिपोर्ट व्हॉट्स अॅपकडे पाठवला आणि त्यात अगदी थोड्या प्रमाणातही तथ्य असल्यास तुमचं अकाऊंट बॅन करण्याचे पूर्ण अधिकार व्हॉट्स अॅपकडे आहेत. (छाया सौजन्य- Pixabay)