मनसेच्या एका पत्राची ताकद... मुंबईतील सर्वात श्रीमंत एरियामधला गुजराती नामफलक स्वत: महापालिकेने काढला

Published: Jun 03, 2026, 03:45 PM IST|Updated: Jun 03, 2026, 03:45 PM IST

Gujarati Signboards: मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरातील गुजराती भाषेतील काही नामफलक महापालिकेने हटवले आहेत.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint1/9

मनसेच्या एका पत्राची ताकद... मुंबईतील सर्वात श्रीमंत एरियामधला गुजराती नामफलक स्वत: महापालिकेने काढल

Gujarati Signboards: मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरातील गुजराती भाषेतील काही नामफलक महापालिकेने हटवले आहेत.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint2/9

कारवाईची मागणी

डुंगरशी रोड येथील स्वातंत्र मैनिक एम. एम. जोशी क्रिडांगण आणि आचार्य विजय ओमकार सुरीश्वर जी महाराज चौक एलिझाबेथ हॉस्पीटलजवळ या ठिकाणी महानगरपालिकेच्या निधीतून जैन किंवा गुजराती भाषेतील नामफलक (बोर्ड) लावण्यात आले आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या फलकांविरोधात अधिकृत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint3/9

नियमबाह्य फलकांवर कारवाई

मनसेच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणे आवश्यक असून नियमबाह्य फलकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint4/9

मुद्दा मनसेकडून उपस्थित

मलबार हिल परिसरातील विविध चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी गुजराती भाषेतील नामफलक लावण्यात आल्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला होता. तक्रारीची दखल घेत बृहन्मुंबई महापालिकेच्या 'ए' विभागाने संबंधित फलकांची तपासणी केली.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint5/9

योग्य कायदेशीर कारवाईचा इशारा

तपासणीनंतर नियमांचे पालन न करणारे किंवा परवानगीविना उभारण्यात आलेले काही गुजराती नामफलक हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. मुंबई व लोकभवन, मुंबई या शासकीय निवासस्थानांसमोर तसेच अन्य ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास आपल्या विरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint6/9

लेखी समज देण्यात आली

आपणाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व आपल्या अशा कृत्यास प्रतिबंध व्हावा म्हणून आपल्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 अन्वये लेखी समज देण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये म्हटलंय.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint7/9

स्थानिक भाषेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत

आपण आपल्या मागणी करता सनदशीर मार्गाने आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन करावे., असे नोटीसमध्ये म्हटलंय. या कारवाईनंतर स्थानिक भाषेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून राजकीय व सामाजिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint8/9

कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई

नोटीसचा भंग झाल्यास व मलबार हिल पोलीस ठाणे हद्दीत गैरकायदेशीर कृत्य घडल्यास लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याबाबत आणि कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल,असेही नोंटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Big Action On Gujarati Signboards in Malabar Hill after MNS Complaint9/9

नियमांनुसार कारवाई

मनसेने या कारवाईचे स्वागत करत मुंबईत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली आहे, तर महापालिकेने ही कारवाई नियमांनुसार केल्याचे स्पष्ट केले आहे.