'अगं, नवरा लपव लवकर'! बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री, जिला पाहून बायका लपवायच्या नवऱ्याचा चेहरा

चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या सुंदर अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून इतर महिला आपल्या नवऱ्याला लपवत असत.   

Soneshwar Patil | Oct 12, 2025, 01:00 PM IST
twitter
1/8

बॉलिवूडमधील 70 च्या दशकातील एक अशी अभिनेत्री होती, जिला मुख्य नायिकेपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळाली. ती म्हणजे बिंदु देसाई. सगळ्यांच्या ओळखीची 'मोना डार्लिंग'.  

twitter
2/8

मोहक, तीक्ष्ण आणि जबरदस्त अभिनयामुळे बिंदु त्या काळातील सर्वात लोकप्रिय वॅम्प ठरल्या. बिंदू देसाई यांच्या वडिलांचे नाव नानूभाई देसाई होते.   

twitter
3/8

त्यांना आपल्या मुलीने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे अशी अपेक्षा होती, मात्र बिंदू यांना लहानपणापासूनच चित्रपट आणि अभिनयाची आवड होती.   

twitter
4/8

त्यांच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर होती. पण चेहऱ्यावरील विनोदी वैशिष्ट्यांमुळे त्यांना सुरुवातीला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाली नाही.  

twitter
5/8

वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी बिंदू यांच्या खांद्यावर आली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांना या वाटचालीत त्यांच्या मेव्हण्याचा मोठा आधार मिळाला.  

twitter
6/8

बिंदू यांनी 1962 मध्ये ‘अनपढ’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. पण हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यावेळी त्या केवळ 21 वर्षांच्या होत्या. मात्र त्यांचा दुसरा चित्रपट ‘दो रास्ते’ त्यांच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला.  

twitter
7/8

या चित्रपटात त्यांनी निगेटिव्ह म्हणजेच खलनायिकेची भूमिका साकारली होती. सुरुवातीला बिंदू या भूमिका करण्यास तयार नव्हत्या, पण कुटुंबीयांच्या आग्रहाखातर त्यांनी ती स्वीकारली.   

twitter
8/8

एका मुलाखतीत बिंदू यांनी सांगितलं होतं, 'लोकांना वाटायचं मी त्यांच्या नवऱ्यांना फसवेन! माझ्या पतीचा एक जिवलग मित्र होता, जो अधूनमधून आमच्याशी बोलायचा, पण त्याच्या पत्नीला वाटायचं मी तिच्या नवऱ्यावर डोळा ठेवते. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं.'  

twitter