पक्ष्यांच्या रंगीत दुनियेची सफर

मुंबईच्या एस्सेल 'बर्ड पार्क'मध्ये वसलेली पक्ष्यांची दुनिया फार अनोखी आहे. पक्ष्याच्या या रंगलेल्या दुनियेत अनेक प्रकारचे पक्षी आहेत. भारतात न अढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती या पक्ष्याच्या बागेत पाहायला मिळत आहेत. 

Apr 18, 2019, 08:22 AM IST

मुंबईच्या एस्सेल 'बर्ड पार्क'मध्ये वसलेली पक्ष्यांची दुनिया फार अनोखी आहे. पक्ष्याच्या या रंगलेल्या दुनियेत अनेक प्रकारचे पक्षी आहेत. भारतात न अढळणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती या पक्ष्याच्या बागेत पाहायला मिळत आहेत. 

1/5

जगभरातील पक्षी उपलब्ध

या बर्ड पार्कमध्ये जगभरातल्या ६० प्रजातींचे एकुण ५५० पक्षी ठेवण्यात आले आहेत. यांमधील काही बाहेरील देशातील पक्षी आहेत. पक्ष्याच्या या अनोख्या विश्वात आफ्रिकन ग्रे पॅरॉट, ब्लॅक लोरी, शहामृग, ब्लॅक हॅन, अमेरिकन वुड डक या पक्ष्यांची झलक पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे.

2/5

फिरण्यासाठी लागणारा वेळ

वेगवेगळे पक्षी पाहाण्यासाठी पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला कमीत-कमी तीन तास लागतील.  प्रत्येक पक्ष्याची माहिती मिळवण्यासाठी किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो. रंगबेरंगी पक्ष्यांची दुनिया दिड एकर जागेत साकारण्यात आली आहे. या बागेत पक्ष्यांना आणण्यासाठी एक वर्षाचा अवधी लागला आहे.   

3/5

पक्ष्यांच्या पायात माहिती

पक्ष्यांबद्दल महिती मिळवण्यासाठी येथील अधिकाऱ्यांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. पक्ष्याच्या पायाला एक लहान पाटी लावण्यात आली आहे. ज्यामध्ये पक्ष्यांबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

4/5

पक्ष्यांची विशेष काळजी

बर्ड पार्कमध्ये राहण्याऱ्या पक्षांना त्रास होवू नये याची विशिष्ट काळजी घेतली जात आहे. आंतरराष्ट्रीय घरांना विचारात घेवून हे पार्क तयार करण्यात आले आहे. पक्ष्यांच्या आहाराची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी कुककडे प्रदान केली आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांसाठी आरोग्य तज्ञ सुद्धा पार्कमध्ये आहे. 

5/5

येणाऱ्या काळात पक्ष्यांची संख्या वाढेल

येत्या काळात या पार्कमध्ये बर्ड पार्कमध्ये आणखी पक्षी दाखल होणार आहेत.