महाराष्ट्र वाचवा! जनता सहन तरी किती करणार?

May 22, 2020, 19:14 PM IST
1/6

कोरोनाविरोध्यातील लढ्यात राज्यात सत्तेवर असणारं महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर एका आंदोलानाच्या माध्यमातून तोफ डागली. 

2/6

लॉकडाऊनच्या काळातच महाराष्ट्र वाचवा अशी हाक देत भाजपचे दिग्गज नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा यात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. 

3/6

'सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू! आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली, शासनाची निष्क्रियता! राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली. मात्र जनता सहन तरी किती करणार?', असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी आपला सहभाग नोंदवला. 

4/6

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा महाराष्ट्र वाचवा असा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. 

5/6

शेतकरी, 12 बलुतेदार आणि असंघटित कामगारांना ५० हजार कोटींचं पॅकेज द्या अशी मागणी करणारे फलक यावेळी अनेकांनीच हाती घेतल्याचं पाहायला मिळालं. 

6/6

महाराष्ट्र वाचवा, या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांचंही लक्ष वेधलं ज्यानंतर राजकीय वर्तुळात यावर काही प्रतिक्रिया उमटल्या.