ब्लड कॅन्सरवर सापडला इलाज! नवी थेरेपी 90 टक्के प्रभावी, रुग्णांना माफक दरात होणार उपलब्ध

Blood Cancer Cure: थेरपी देताना काही दुष्परिणाम होत असल्यास ते दुरुस्त करणे, असे खर्चदेखील आहेत. हे उत्पादन स्वदेशी आहे, त्यामुळे त्याची किंमत 40 ते 50 लाख रुपये असेल. हे य

| Oct 21, 2023, 10:02 AM IST

Blood Cancer Cure: CAR-T सेल थेरपीच्या वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. आता राज्य एफडीएसह काही किरकोळ मान्यता प्रलंबित आहेत.

1/11

ब्लड कॅन्सरवर सापडला इलाज! नवी थेरेपी 90 टक्के प्रभावी, रुग्णांना माफक दरात होणार उपलब्ध

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

Car T Therapy India : ब्लड कॅन्सर झालेल्या रुग्णाला आयुष्य उद्धस्त झाल्यासारखे वाटते. पण आता अशा रुग्णांना काळजी करण्याची गरज नाही. IIT मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तज्ञांनी एकत्र येत अनोखा   अविष्कार केला आहे. त्यांनी एक CAR-T सेल थेरपी विकसित केली आहे. यामुळे ब्लड कॅन्सरच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

2/11

खूप किफायतशीर

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

आनंदाची बाब म्हणजे  CAR-T सेल थेरपी लहान मुलांमध्ये 99 टक्के प्रभावी आहे. तसेच प्रौढांमध्येही ती प्रभावी आहे. ही देशातील ही पहिली CAR-T सेल थेरपी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. तसेच ही थेरपी परदेशात उपलब्ध असलेल्या थेरपीच्या तुलनेत खूप किफायतशीर आहे आणि त्याचे दुष्परिणाम देखील खूप कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

3/11

थेरपीमध्ये दुष्परिणाम नाही

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

आम्ही दोन टप्प्यात याची चाचणी केली असून पहिल्या टप्प्यात सुरक्षेबाबत चाचण्या घेण्यात आल्याचे टाटा रुग्णालयाचे कर्करोगतज्ज्ञ डॉ.हसमुख जैन यांनी सांगितले. मेंदूवर परिणाम करणारे न्यूरोटॉक्सिसिटी आणि साइटोकाइन रिलीझ सिंड्रोम सारखे दुष्परिणाम परदेशात उपलब्ध असलेल्या उपचारांमध्ये दिसून आले आहेत, परंतु आमच्या सेल थेरपीमध्ये दोन्ही दुष्परिणाम आढळले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

4/11

थेरपीचा प्रयोग

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

दुसऱ्या टप्प्यात, ज्या रुग्णांवर स्टँडर्ड थेरपी अयशस्वी झाली होती त्यांच्यावर या थेरपीचा प्रयोग करण्यात आला. ज्या रुग्णांचा जगण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, अशा रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे. आम्हाला अशा रुग्णांमध्ये 70 टक्के सकारात्मक परिणाम आढळल्याचे डॉक्टर सांगतात. 

5/11

मुलांमध्ये 99% यशस्वी

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

CAR-T सेल थेरपीला मुलांमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. जून 2021 मध्ये सुरू झालेल्या या चाचणीचे मुलांवर खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. ज्या मुलांमध्ये BMT आणि केमोथेरपी यशस्वी झाली नाही अशा मुलांमध्ये CAR-T सेल थेरपीची चाचणी घेण्यात आली आणि कर्करोग कमी करण्यात आला.

6/11

99 टक्के मुलांवर चांगला परिणाम

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

या उपचाराचा 99 टक्के मुलांवर चांगला परिणाम झाला.  CAR-T पेशी शरीरात राहतात आणि कर्करोग पुन्हा होणे रोखण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात, असे टाटा हॉस्पिटलचे पेडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव नरुला यांनी सांगितले.

7/11

दोन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

CAR-T सेल थेरपीमध्ये आपण रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी काढून टाकतो. आयआयटी अभियंत्यांद्वारे प्रयोगशाळेत पेशी अनुवांशिकरित्या सुधारित केल्या जातात. एक जनुक पेशींमध्ये प्रवेश केला जातो, ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. प्रथम, चांगल्या पेशी, ज्या शरीरात हळूहळू वाढत होत्या, त्या वेगाने वाढतील. CAR-T सेलचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते कर्करोगाच्या पेशींना प्रभावीपणे लक्ष्य करते आणि नष्ट करते, असे डॉ. जैन यांनी सांगितले.

8/11

प्लेटलेट्सचे रक्तसंक्रमण

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

प्रयोगशाळेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, रुग्णामध्ये CAR-T पेशींचे संक्रमण केले जाते. हे उपचार फक्त एका चक्रात केले जातात. असे असले तरी आवश्यक असल्यास, दुसरी सायकल देखील केली जाऊ शकते. ज्याप्रमाणे प्लेटलेट्सचे रक्तसंक्रमण केले जाते, त्याचप्रमाणे CAR-T पेशी देखील रक्तसंक्रमित केल्या जातात. फक्त मशीनच्या सेटिंग्ज वेगळ्या आहेत.

9/11

कमी साइड इफेक्ट्स आणि खर्च

परदेशात या थेरपीमध्ये वापरल्या जाणार्‍या जनुकीय सुधारित पेशींची किंमत 3 ते 4 कोटी रुपये असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्वात कमी दरातील उत्पादन फक्त चीन आणि इस्रायल मध्ये  80 लाख ते 1 कोटी उपलब्ध आहे. 

10/11

किंमत 40 ते 50 लाख

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

थेरपी देताना काही दुष्परिणाम होत असल्यास ते दुरुस्त करणे, असे खर्चदेखील आहेत. हे उत्पादन स्वदेशी आहे, त्यामुळे त्याची किंमत 40 ते 50 लाख रुपये असेल. हे यूएसएमध्ये विकल्या जाणार्‍या थेरपीच्या किंमतीच्या 10 टक्के असल्याची माहिती देण्यात आली.

11/11

दीड ते दोन महिन्यात उपलब्ध

Blood Cancer Cure New CAR T Cell Therapy IIT Bombay Tata Hospital Health Marathi News

CAR-T सेल थेरपीच्या वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मंजुरी मिळाली आहे. आता राज्य एफडीएसह काही किरकोळ मान्यता प्रलंबित आहेत. ही प्रक्रिया दीड ते दोन महिन्यांत पूर्ण होईल. यानंतर रुग्णाला माफक दरात उपचार मिळावेत यासाठी टाटा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.