ठाकरे बंधूंची गेल्या तीन महिन्यांतील सातवी भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाचे वारे

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : कसा पुढे गेला ठाकरे बंधूंच्या भेटीला सिलसिला? जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या कारणानं झाली भेट?   

Sayali Patil | Oct 12, 2025, 02:29 PM IST
twitter
1/8

स्थानिक स्वराज्य संस्था

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मनसे आणि ठाकरेच्या शिवसेना पक्षात युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा असलेल्या ठाकरे बंधूंमध्ये सौहार्द आणि जवळीक सातत्यानं वाढत असून, आता थेट युतीच्या शक्यतांवर गंभीर विचारमंथन सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.   

twitter
2/8

ठाकरे बंधूंच्या भेटींचा घटनाक्रम

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

5 जुलै 2025 मराठी भाषा मेळाव्यात ठाकरे बंधू प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. या भेटीने दोघांमधील दुराव्याचा बर्फ वितळण्यास सुरुवात झाली.  

twitter
3/8

27 जुलै 2025

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

27 जुलै 2025 मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढताच, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' निवासस्थानी भेट दिली. ही भेट राजकीय आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरली.  

twitter
4/8

27 ऑगस्ट 2025

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

27 ऑगस्ट 2025: राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच, तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजेरी लावली. ही भेट भावनिक आणि राजकीयदृष्ट्या लक्षवेधी ठरली.

twitter
5/8

10 सप्टेंबर 2025

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

10 सप्टेंबर 2025: गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा भेट घडली. यावेळीही 'शिवतीर्थ' येथे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा अपूर्ण राहिल्या, परंतु बंधूंमधील सौहार्द दृढ झाले.

twitter
6/8

15 सप्टेंबर 2025

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

15 सप्टेंबर 2025: सप्टेंबरमध्येच उद्धव ठाकरे पुन्हा 'शिवतीर्थ' येथे दाखल झाले. या भेटीत युतीच्या शक्यतांवर अधिक गंभीर चर्चा झाल्याचे संकेत मिळाले.  

twitter
7/8

5 ऑक्टोबर 2025

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

5 ऑक्टोबर 2025: ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला ठाकरे बंधू कुटुंबासह एकत्र दिसले. याच दिवशी दुपारी राज ठाकरे यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, ज्यामुळे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.  

twitter
8/8

12 ऑक्टोबर 2025

bmc election 2026 Raj Thackeray uddhav thackeray meeting

12 ऑक्टोबर 2025: राज ठाकरे यांनी आपल्या मातोश्रींसह 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. ही भेट केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण मानली जात आहे  

twitter