close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जंगल सफरीवर निघाले आलिया- रणबीर; पाहा काही खास क्षण

Sep 08, 2019, 13:02 PM IST
1/5

जंगल सफरीवर निघाले आलिया- रणबीर; पाहा काही खास क्षण

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याविषयी आता कोणतीही बाब लपून राहिलेली नाही. माध्यमांसमोरही एकत्र देत आपल्या नात्याची आणि प्रेमाची ग्वाही देणारी ही जोडी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या वेळापत्रकातून उसंत मिळताच सुट्टीसाठी एका नव्या ठिकाणी गेले आहेत. (छाया सौजन्य: Alia Bhatt/Instagram)

2/5

जंगल सफरीवर निघाले आलिया- रणबीर; पाहा काही खास क्षण

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या या सुट्टीदरम्यानचे काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आणि रणबीर धकाधकीच्या आयुष्यापासून दूर काही खास क्षण अनुभवत आहेत. (छाया सौजन्य: Alia Bhatt/Instagram)

3/5

जंगल सफरीवर निघाले आलिया- रणबीर; पाहा काही खास क्षण

आलिया आणि रणबीर हे जंगल सफारीवरही गेल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या साथीने नव्या गोष्टींचा अनुभव घेणारी ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (छाया सौजन्य: ranbir_kapoor08_/Instagram)

4/5

जंगल सफरीवर निघाले आलिया- रणबीर; पाहा काही खास क्षण

मुख्य म्हणजे आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो आणि तिच्या प्रत्येक फोटोचं कॅप्शन पाहता खऱ्या अर्थाने ती सुट्टीच्या या दिवसांचा मनमुराद आनंद घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.   (छाया सौजन्य: Alia Bhatt/Instagram)

5/5

जंगल सफरीवर निघाले आलिया- रणबीर; पाहा काही खास क्षण

गेल्या वर्षापासूनच आलिया आणि रणबीरचं नातं, प्रकाशझोतात आलं होतं. येत्या काळात हे दोघंही अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून झळकणार आहेत. शिवाय त्यांच्या लग्नाच्या चर्चांनीही आता डोकं वर काढलं आहे. तेव्हा आता त्यांच्या लग्नाविषयीची अधिकृत घोषणा केव्हा केली जाते, याचीही उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. (छाया सौजन्य: cutealiaabhatt/Instagram)