आज इबादत रुबरु हो गई....

Nov 14, 2019, 11:21 AM IST
1/9

आज इबादत रुबरु हो गई....

'गोलियों की रासलीला- राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनीही एक वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/9

आज इबादत रुबरु हो गई....

जवळपास सहा वर्षांच्या नात्यानंतर या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर कुटुंबासमवेत चाहत्यांच्याही वर्तुळात आनंदाची लाट पसरली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

3/9

आज इबादत रुबरु हो गई....

अशा या 'मोस्ट हॅपनिंग' सेलिब्रिटी जोडीच्या सहजीवनाच्या प्रवासाला म्हणजेच त्यांच्या वैवाहिक जीवनाला आज, १४ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झालं आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/9

आज इबादत रुबरु हो गई....

दीपिका आणि रणवीरचा वर्षभरापूर्वी सुरु झालेला हा स्वप्नवत प्रवास पाहताना आज, त्यांच्या लग्नातील काही क्षण, छायाचित्र पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/9

आज इबादत रुबरु हो गई....

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला प्रत्येक फोटो बरंच काही बोलत आहे. भावना व्यकत करत आहे. हे फोटो पाहताना दीपिका आणि रणवीर या दोघांनीही आतापर्यंत एकत्र काम केलेल्या चित्रपटांतील गीतांच्या ओळीही अगदी समर्पक वाटत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

6/9

आज इबादत रुबरु हो गई....

इटलीतील लेक कोमो येथे पार पडलेल्या त्यांच्या विवाहसोहळ्यातील क्षणचित्र पाहताना, आज इबादत रुबरु हो गई.... अशा ओळींचा उल्लेख करण्यास हरकत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

7/9

आज इबादत रुबरु हो गई....

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साथीने दीप-वीरने लग्नगाठ बांधली होती. दाक्षिणात्य आणि सिंधी चालीरिती आणि विवाह पद्धतींनुसार हा सोहळा थाटामाटात पार पडला होता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

8/9

आज इबादत रुबरु हो गई....

मुख्य म्हणजे यामध्ये प्रत्येक छायाचित्रातून दीपिका आणि रणवीरच्या सुरेख नात्याची ग्वाही सर्वांनाच मिळत आहे. एकमेकांप्रती असणारा आदर, प्रेम, अभिमान अशा सर्व भावना त्या क्षणी एकवटल्या होत्या हेच खरं.  (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

9/9

आज इबादत रुबरु हो गई....

एकंदरच काय, तर त्यांच्या विवाहसोहळ्यातील हे खास क्षण पाहता दीप- वीर खऱ्या अर्थाने बी- टाऊनची आदर्श जोडी आहे हेच सिद्ध होत आहे. अशा या जोडीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)