1/6
Happy Birthday Priyanka Chopra : पाहा 'फॅशन'बाज प्रियांकाच्या गाजलेल्या भूमिका
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या आंतरराष्ट्रीय कलाविश्वात कायमच चर्चेत असते. तिने साकारलेल्या बोल्ड भूमिकांपासून ते अगदी अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत संसार थाटण्याच्या तिच्या निर्णयापर्यंत, प्रत्येक वेळी प्रियांकाना चाहत्यांना थक्क केलं. अशा या 'देसी गर्ल'चा आज वाढदिवस. या खास दिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सौंदर्यस्पर्धेच्या माध्यमातून जगासमोर तिचा चेहरा आला आणि भारतीय कलाविश्वालाही एक नवी अभिनेत्री मिळाली. प्रियांकाने आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट साकारले. पण, त्यातही तिच्या काही भूमिका विशेष गाजल्या. चला तर मग, नजर टाकूया तिच्या अशाच काही भूमिकांवर....
2/6
Happy Birthday Priyanka Chopra : पाहा 'फॅशन'बाज प्रियांकाच्या गाजलेल्या भूमिका
फॅशन- प्रियांकाच्या अभिनयाला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची दाद मिळाली ती म्हणजे 'फॅशन' या चित्रपटाच्या माध्यमातून. फॅशन विश्वात झगमगाट आणि ग्लॅमरच्या पलीकडे नेमकं काय घडतं, एक मॉडेल म्हणून समोर येणारी 'ती' नेमकी किती आव्हानांना तोंड देत असते, याचं अत्यंत प्रभावी चित्रण या चित्रपटातून साकारण्यात आलं होतं. प्रियांकाची चित्रपटातील भूमिका तिच्या अभिनयकौशल्याची दमदार झलक दाखवून गेली.
3/6
Happy Birthday Priyanka Chopra : पाहा 'फॅशन'बाज प्रियांकाच्या गाजलेल्या भूमिका
4/6
Happy Birthday Priyanka Chopra : पाहा 'फॅशन'बाज प्रियांकाच्या गाजलेल्या भूमिका
5/6
Happy Birthday Priyanka Chopra : पाहा 'फॅशन'बाज प्रियांकाच्या गाजलेल्या भूमिका
मेरी कोम- एका खेळाडूची भूमिका साकारताना 'कभी किसीको इतना भी मत डरो की डर ही खतम हो जाए', हा संवाद अतिशय ताकदीने रुपेरी पडद्यावर साकारणारी प्रियांका कोणीही विसरु शकलेलं नाही. 'मेरी कोम' या चित्रपटातून तिने बॉक्सिंग क्षेत्रात भारताचं नाव उज्वल करणाऱ्या 'मेरी कोम' या महिला खेळाडूची व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी प्रियांकाने प्रचंड मेहनत घेतली होती.
6/6