close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

Jun 17, 2019, 12:38 PM IST
1/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

बॉलिवूड सेलिब्रिटी हे रुपेरी पडद्यावर त्यांच्या कामामुळे जितके चर्चेत असतात, तितकंच त्या कलाकारांच्या खासगी आयुष्यात नेमकं काय घडत असावं, याचं कुतूहल चाहत्यांना नेहमीच असतं. सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे कलाकार मंडळींनीही कायमच चाहत्यांचं हे कुतूहल पाहता त्यांच्यासी एक वेगळ्या प्रकारचं नातं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आणि या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनम तिच्या दैनंदिन आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांची माहिती चाहत्यांना देत असते. सध्याच्या घडीला बॉलिवूडची ही फॅशन डिवा तिच्या पतीसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

खुद्द सोनमनेच तिच्या या खास सुट्टीच्या दिवसांतील फोटो शेअर केले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

3/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

पती आनंद अहूजा याच्यासोबत ती हे खास दिवस व्यतीत करत असून या फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांनाही जपानची सफर घडवत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

नेहमीच आनंद अहूजा म्हणजे पतीसोबतचे काही सुरेख फोटो पोस्ट करत #CoupleGoals देणारी सोनम यावेळी #TravelGoals ही देत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या या फोटोंमधून जपानमधील संस्कृतीचंही दर्शन घडत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

6/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

जपानमधील राहणीमान आणि त्यांच्या एकंदर वावरण्याचा अंदाजही सोनमने शेअर केलेल्या य़ा फोटोंमधून पाहता येत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

7/7

जपानमध्ये सोनमची 'आनंद'वारी

जपान हा देश गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अनेकांच्याच 'विशलिस्ट'मध्ये असणाऱ्या आणि जगाच्या नकाशावर अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या या देशाचं निसर्गसौंदर्यही सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.  (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)